वैभववाडी
महात्मा गांधी, महात्मा फुले इत्यादी सह महाराष्ट्रातील इतर महापुरुषांबद्दल सतत अपशब्द वापरून त्यांचा अपमान करणाऱ्या संभाजी भिडे यांचा विरोधात आज वैभववाडी तालुका काँग्रेस च्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी संभाजी भिडे यांच्या प्रतिमेला काळे फासण्यात आले व भिडेंच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांच्या वक्त्यावांचा निषेध करण्यात आला.
यावेळी काँग्रेस कर्यकर्त्यांनी संभाजी भिडे यांचा धिक्कार असो, या संभाजी भिडेचे करायचे काय खाली डोके वर पाय अशा घोषणा दिल्या. यानंतर सर्व पधादिकारी व कार्यकर्त्यांनी वैभववाडी पोलीस स्थानकात जाऊन महात्मा गांधीजी यांचा अपमान करणाऱ्या संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा नोदवून त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करून तसे निवेदन सादर केले.
यावेळी तालुका अध्यक्ष दादामिया पाटणकर, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार अध्यक्ष गुलजार काझी, जिल्हा सचिव मीनाताई बोडके, तालुका महिला अध्यक्ष प्रांजली जाधव, तालुका सेवादल अध्यक्ष अशोक राणे, सामाजिक न्याय विभाग तालुका अध्यक्ष प्रकाश जाधव, तालुका उपाध्यक्ष वसंत नाटेकर, अहमद बोबडे, वासिम काझी, मुरादआली ठाणगे, दस्तगीर नाचरे, मुस्ताकिन पाटणकर व अशोक कांबळे इत्यादि कार्यकर्ते उपस्थित होते.