राष्ट्रवादी कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर
कणकवली
जि.प.वर सध्या प्रशासकीय राजवट असल्याने नवीन कुर्ली ग्रा.पं. निर्मितीचा प्रस्ताव मार्गी लागला आहे. 9 फेब्रुवारी 2023 रोजी हा प्रस्ताव जि.प.कडून कोकण आयुक्तांना पाठविण्यात आला. त्यानंतर 13 मार्च 2023 रोजी प्रस्ताव मंत्रालयात पाठविण्यात आला. सध्या हा प्रस्ताव ग्रामविकास मंत्र्यांकडे प्रलंबित आहे. त्यानंतर तो मंत्रीमंडळाच्या बैठकीत ठेवण्यात येईल. अशी वस्तुस्थिती असताना भाजप व शिंदे गटाचे पदाधिकारी नवीन कुर्ली ग्रा.पं. मंजुर झाल्याची दवंडी पिटवत मुख्यमंत्र्यांसमवेत फोटोसेशन करत आहेत, गावात जल्लोष मिरवणुका काढत आहेत. हे त्यांचे अज्ञान असून ते नागरिकांची केवळ दिशाभूल करत असल्याची टीका श्री. पिळणकर यांनी केली.
यावेळी त्यांनी आपण ग्रा.पं.साठी करत असलेल्या पाठपुराव्याची कागदपत्रे पत्रकारांसमोर सादर केली. विरोधकांनी आपल्याला कधीही सांगावे, आपण हे सर्व पुरावे त्यांनाही दाखवू असे ते म्हणाले.