You are currently viewing “शिवराज्याभिषेकामुळे स्वराज्याला कायदेशीर स्वरूप प्राप्त!”*

“शिवराज्याभिषेकामुळे स्वराज्याला कायदेशीर स्वरूप प्राप्त!”*

*”शिवराज्याभिषेकामुळे स्वराज्याला कायदेशीर स्वरूप प्राप्त!”*

पिंपरी

“शिवराज्याभिषेकामुळे स्वराज्याला कायदेशीर स्वरूप प्राप्त झाले!” असे विचार युवा इतिहास संशोधक डॉ. केदार फाळके यांनी पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवडगाव येथे शनिवार, दिनांक २९ जुलै २०२३ रोजी व्यक्त केले. छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीने आयोजित केलेल्या ‘श्री शिवराज्याभिषेक : हिंदू अस्मितेचा आविष्कार’ या मार्गदर्शनपर व्याख्यानात डॉ. केदार फाळके बोलत होते. समितीचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, कार्यवाह ॲड. सतिश गोरडे, सदस्य अशोक पारखी, डॉ. अनू गायकवाड, नितीन बारणे, शाहीर आसराम कसबे यांची प्रमुख उपस्थिती होती; तसेच क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित शाळांमधील शिक्षकवृंदाची सभागृहात उपस्थिती होती. याप्रसंगी छत्रपती शिवाजीमहाराज यांचे पायदळातील सरसेनापती येसाजी कंक यांचे चौदावे वंशज सिद्धार्थ कंक आणि आकाश कंक यांना स्मृतिचिन्ह, ग्रंथ आणि शाल प्रदान करून गौरविण्यात आले. तसेच उल्लेखनीय कार्याबद्दल विश्व हिंदू परिषद मातृशक्ती पुणे विभाग संयोजिका प्रिया रसाळ यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला.

डॉ. केदार फाळके पुढे म्हणाले की, “संपूर्ण आयुष्यभर कोणत्याही सम्राटाचे मांडलिकत्व न पत्करणारे शिवाजीमहाराज हे तत्कालीन सार्वभौम राजे होते. औरंगजेबाने हिंदुस्थानातील अनेक राजे – महाराजे यांना मांडलिक केले. पाचशे हिंदू मंदिरांची विटंबना केली. जिझिया कर लादला. हिंदूंवर अत्याचार केले. या विरोधात शिवाजीमहाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली. पूर्वी कधीही रक्तपात झालेला नाही अशा दृष्टीने पावन, पवित्र रायगडावर आपले तख्त उभारले. शनिवार, दिनांक ०६ जून १६७४ रोजी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, शके १५९६ या तिथीला शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. १९ मेपासून या सोहळ्याच्या विविध विधींचा प्रारंभ झाला होता. सर्वत्र यवनांचे राज्य असताना एक मराठा राजा सार्वभौम राजा झाला, ही जगाच्या दृष्टीने असामान्य बाब होती. शिवराज्याभिषेकामुळे हजारो वर्षांनी मुघल साम्राज्याला आव्हान देणारी गोष्ट साध्य झाली!” चित्रफितीच्या माध्यमातून डॉ. केदार फाळके यांनी शिवराज्याभिषेकाची अतिशय सविस्तर आणि अभ्यासपूर्ण माहिती दिली. शाहीर योगेश आणि कवी भूषण यांच्या कवनांचे सादरीकरण करून त्यांनी आपल्या व्याख्यानाचा समारोप केला.

प्रतिमापूजन, प्रज्ञा फुलपगार यांनी गायलेले सांघिक पद्य, गुरुकुलम् मधील विद्यार्थ्यांचे शिवस्तवन आणि शाहीर आसराम कसबे यांनी सादर केलेल्या शिवगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. गिरीश प्रभुणे यांनी प्रास्ताविक केले. ॲड. सतिश गोरडे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. आरती शिवणीकर, अतुल आडे, गुरुकुलम् मधील शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी संयोजनात परिश्रम घेतले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

*संवाद मीडिया*

*-💫🐏-🐓–-🐄-🐃– ✴️

*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे नाते*❤‍🩹

✴️ *मान्सून ऑफर* ✴️

*माय कॅल गोल्ड 24* & *माय मिन मिनरल* पावडर *माय लिवो टॉनिक*
*मोफत*

https://sanwadmedia.com/98343/
फक्त दुधाळ जनावरेच नाही तर कोंबडीच्या पिल्लांपासून,शेळी – बकरे व इतर जनावरांनाही लिव्हर टॉनिक, लिव्हर टॉनिक कमीत कमी एक दीड महिन्याच्या अंतराने आठ दिवस सतत वापरल्यास जनावरांच्या शरीरात Metabaiological बदल होत असल्याने चारा,खाद्यातून किंवा खाद्यावर बुरशी( Tocxic) आल्याने पचनक्रियेवर परिणाम होऊन आपण दिलेले खाद्य 100% अंगी लागत नाही त्याचा परिणाम आपल्या व्यावस्यावर होतो. याचा विचार करून *मैत्रेय ऍग्रो & वेट केअर* कंपनीने शेतकऱ्यांना माय कॅल गोल्ड 24 आणि माय मिन ( मिनरल्स) वर *माय लिवो टॉनिक* मोफत द्यायचे ठरविले आहे. त्याच बरोबर माय लिवो टॉनिक फक्त *MRP ₹ १००/-* मध्ये २००मिलि पॅक बाजारात उपलब्द केले आहे.
मैत्रेय ऍग्रो & वेट केअर च्या कोणत्याही प्रॉडक्ट्स च्या *गुणवत्ते* बाबत *पशुवैदेकीय अधिकाऱ्यांचा* सल्ला घ्यावा.

✴️ उत्पादने.

*Mai Cal X gel माय कॅल एक्स जेल*
👉.. 300ml सिंगल डोस..
गाय / म्हैस विण्यापूर्वी 6-12 तास अगोदर आणि विल्या नंतर 6 – 12 तासानंतर.अशक्त आणि उठवणीस आलेल्या जनावरांना.
*वाजवी किंमत रु 175/-*

*Mai Min Powder*+
मिनरल अँड व्हिटॅमिन—– ( मेथो चिलटेड ).🐃🐄🦌
👉 भरगोष वाढ, फ‌ँट मध्ये वाढ,वेळेवर गाभाला जाने आणि जनावर तंदुरुस्तची खात्री.

*🐮भरगोष दूध वाढीसाठी🥛*

*👉माय – कॅल गोल्ड 24* 🎯
Mai Cal Gold 24 ( कॅल्शियम लिक्विड)

*👉माय- ग्लुको सिरप* .. Mai Gluco Syrup.
त्वरित पाना सोडणे, 🐄 – लुळेपणा नाहीसा, दुधात वाढ, अंडी देण्याचा कालावधीत वाढ, कोंबडी एकमेकास बोचत नाहीत,🐓 नेहमी फ्रेश दिसून येईल.

*👉माय-लिओ टॉनिक*🫀🫁
भरपूर भूक लागणे, भरपूर गाणी पिणे, शुद्ध रक्तपुरवठा, पचनशक्तीत सुधारणा. फँट मध्ये नियमित पणा.

*👉माय सॉल्ट लिक्स* चाटण विटा
जनावर माती,दावी खात नाहीत, पचनक्रियेत सुधारणा सोबत कॅलसियम आणि इतर घटक

*👉माय- एम बी प्लेक्स* बी कॉम्प्लेक्स सिरप 💧🐓
( अँटी ट्रेस)
जनावर नेहमी फ्रेश,कोंबडी – वासरे – बकरे भरघोस वाढ, उष्णनेतेचा त्रास होत नाही. दुधाळ गायीना उष्णेतेचा त्रास न होता दुधात नियमितता.
*–👌– Mai Prozyme –👌*🐐🐃☘️
👉 बकरे / वासारे वजनात वाढ,
👉सर्व जनावरांची उत्तम पचणक्रिया
👉दुध उत्पादनात नियमितता.

*✅सर्व मेडिकल आणि पशु खाद्य दुकानातून उपलब्ध*

कोकणातील शेतकऱ्यांना दर्जेदार उत्पादने आणि मोठी सवलत देणारी, शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असणारी एकमेव स्थानिक कंपनी…
*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*रावराणे.*
*📲9987703088*
*📲7977602845*

🌎 Visit: www.mvetcare.com

*Advt link*
https://sanwadmedia.com/98343/
———————————————-

 

प्रतिक्रिया व्यक्त करा