मसुरे :
मसुरे येथे मुस्लिम धर्मियांच्या मोहरम उत्सवाची सांगता शनिवारी सायंकाळी झाली. मोहरम’ हे इस्लामिक कॅलेंडरमधील पहिल्या महिन्याचे नाव. या महिन्याने इस्लामच्या नव्या वर्षाची सुरुवात होते. मोहरम महिन्यात हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हसेन आणि हुसैन हे दोघेही करबला येथे शहीद झाले होते. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मुस्लिम बांधव या दिवशी शोक व्यक्त करतात. मोहरम निमित्त मसुरे बाजारपेठ येथील रफिक शाह वल्ली मोहल्ला आणि मसुरे भरतगड पायथ्या खालील चिस्ती मोहल्ला व मसुरे पेमवडे येथील एकूण तीन ताबूतांची मिरवणुक काढण्यात आली. ठिकठिकाणी सरबत वाटप करण्यात आले.
मसुरे येथील मुख्य बाजारपेठ व मर्डे विठ्ठल मंदिर येथे मुस्लिम धर्मीय बांधवांनी फेर धरत प्रार्थना केली. यावेळी मूनवर सय्यद, यासिन सय्यद, इरफान शेख, अजीजुर चिस्ती, खलील चिस्ती, पपु शेख, जमीर चिस्ती, बिलाल शेख, जुबेर शेख, अन्वर शेख, इकबाल शेख इम्तियाज शेख, इम्तियाज सैयद, इम्रान शेख, यासिन शेख, दाऊद शेख, नासिर शेख, नाझीम शेख, कैसर शेख, इल्लू शेख, फैजान शेख, एजाज शेख आदी मसुरे, पेमवडे येथील मुस्लिम बांधव, महिला, हिंदू बांधव उपस्थित होते. मसुरे पोलीस यानी वाहतूक नियोजन केले.