You are currently viewing सध्याचे युग हे स्पर्धेचे युग, स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःला संपन्न बनवावे –  राणीसाहेब ह. हा.सौ.शुभदादेवी खेमसावंत भोसले 

सध्याचे युग हे स्पर्धेचे युग, स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःला संपन्न बनवावे –  राणीसाहेब ह. हा.सौ.शुभदादेवी खेमसावंत भोसले 

सावंतवाडी

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने श्री पंचम खेमराज महाविद्यालय व राजमाता सत्वशीला देवी भोसले कनिष्ठ महाविद्यालयात एकदिवसीय उद्बबोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या उद्बबोधन वर्गाला कनिष्ठ महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मानवाला जीवन जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टी जशा आवश्यक आहेत तसेच शिक्षणही अतिशय आवश्यक आहे. ज्याच्याकडे उत्तम ज्ञान तोच जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती. ज्ञान हीच खरी संपत्ती आहे आणि त्याचा वापर व्यक्ती कल्याणसाठी झाला पाहिजे असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन राणीसाहेब सौ. शुभदादेवी खेमसावंत भोसले यांनी केले.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या पुढे म्हणाल्या की सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःला संपन्न बनवण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वयंसिस्त पाळली पाहिजे. विद्यार्थी जीवनात विद्यार्थ्यांनी चांगल्या सवयी जोपासल्या पाहिजेत. मोबाईलचा वापर कमी केला पाहिजे आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या सुविधांचा वापर करून या संधीचे विद्यार्थ्यांनी सोने करावे असे आवाहनही यावेळी राणीसाहेबांनी केले.

या एकदिवसीय उद्बोधन कार्यक्रमाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन राणीसाहेब शुभदादेवी भोंसले यांनी केले. यावेळी मंडळाचे सदस्य श्री. जयप्रकाश सावंत, महाविद्यालयाचे प्रा. डॉ. डी. एल.भारमल, उद्बोधन वर्गासाठी मार्गदर्शक म्हणून आलेले प्रा. सोहन तिवडे, प्रा. सचिन श्रावस्ती कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक श्री व्ही पी राठोड आदी उपस्थित होते.

उद्बबोधन वर्गाच्या प्रथम सत्रात ‘दि एज’ इन्स्टिट्यूटचे प्रा. सोहन तिवडे व दुसऱ्या सत्रात संजय घोडावत युनिव्हर्सिटी चे प्राध्यापक सचिन श्रावस्ती यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. व्ही. पी. राठोड यांनी केले व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागाच्या सौ. पी. डी. सावंत यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल यांनी आभार मानल यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे श्री एम. व्ही. भिसे, श्री. ए. ए. कांबळे, श्री ए. एस. गवळी आदी सर्व शिक्षक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा