You are currently viewing केंद्रशाळा शेर्पेमध्ये भरले रानभाज्यांचे प्रदर्शन*

केंद्रशाळा शेर्पेमध्ये भरले रानभाज्यांचे प्रदर्शन*

*केंद्रशाळा शेर्पेमध्ये भरले रानभाज्यांचे प्रदर्शन*

कणकवली

जिल्हापरिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा शेर्पे तालुका कणकवली या शाळेमध्ये दरवर्षीप्रमाणे विद्यार्थ्यांना पावसाळ्या ऋतूमध्ये उगवणाऱ्या विविध रानभाज्यांची माहिती व्हावी व त्यांची चव चाखता यावी याकरिता रानभाज्यांचे प्रदर्शन शाळेमध्ये मांडले जाते .पालकांनी आपल्या मुलांना आपल्या परिसरामध्ये उपलब्ध होणाऱ्या विविध रानभाज्यांची उपलब्धता करून दिल्यामुळे रानभाज्या प्रदर्शन हा शाळेचा उपक्रम चांगल्या उत्साहात संपन्न झाला .सदर रानभाज्या प्रदर्शनाला निशा गुरव माजी सरपंच ग्रामपंचायत शेर्पे यांनी भेट देऊन शाळेमध्ये आयोजित रानभाज्या प्रदर्शन या उपक्रमाच्याआयोजनाबाबत मुख्याध्यापक सर्व शिक्षक व विद्यार्थी व पालक यांचे विशेष कौतुक केले .सदर प्रदर्शनामध्ये सहज उपलब्ध होणाऱ्या रानभाज्या काटले , शेवगा, टाकळा, कुर्डू ,बांबूचे कोंब, गोट्याचा वेल ,हिरवा माठ, रान तोंडली ,अळू इत्यादी रानभाज्या प्रदर्शनात मांडून त्यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली .रानभाज्या प्रदर्शन मांडणीमध्ये भाजीचे नाव ,त्याचा उपयोग , महत्व इत्यादीची माहिती मुख्याध्यापक दशरथ शिंगारे ,शिक्षक कविता हरकुळकर, अमरीन शेख ,मोहिनी पाटील यांनी दिली .तसेच प्रदर्शनात मांडणी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या रान भाजीचे नाव आणि त्याचे उपयोग प्रदर्शनाला भेट देणाऱ्या सर्वांना सांगितले . रानभाज्या प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी योगदान देणाऱ्या शिक्षक, विद्यार्थी व पालक यांचेअभिनंदन व विशेष कौतुक गटशिक्षणाधिकारी – किशोर गवस,विस्तार अधिकारी तळेरे -प्रेरणा मांजरेकर ,केंद्रप्रमुख शेर्पे – संजय पवार यांनी केले .

प्रतिक्रिया व्यक्त करा