You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समजला दाखले नाकारणाऱ्या त्या अधिकाऱ्यावर कारवाई करा – आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत केली मागणी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समजला दाखले नाकारणाऱ्या त्या अधिकाऱ्यावर कारवाई करा – आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत केली मागणी

आमदार राणेंच्या मागणीची विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी घेतली गंभीर दखल

मंत्री गावित यांना दिल्या उचित कारवाईच्या सूचना

कणकवली

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजाच्या विद्यार्थ्यांना मुद्दामहून जातीचे दाखले नाकारणाऱ्या ठाणे येथील जात पडताळणी विभागातील पावरा नावाच्या अधिकाऱ्याची तातडीने बदली करा. हे अधिकारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजाच्या विद्यार्थ्यांना मुद्दामून त्रास देतात.त्यांचे दाखले नाकारतात,अडवून ठेवतात. अखेर या विद्यार्थ्यांना न्यायालयात जाऊन दाद मागावी लागते आणि न्यायालय ते दाखले वैध ठरवते. याचाच अर्थ पूर्णतः नियमात असलेले दाखले हे अधिकारी मुद्दामून नाकारत असतात. अशा अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी आणि त्यांची त्या ठिकाणाहून बदली करावी अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी विधान सभेत केली. या मागणीवर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंत्री गावित यांना सुचित करताना आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केलेला प्रश्न हा महत्त्वाचा आहे.त्यांची सूचना गांभीर्याने घ्या. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन त्या अधिकाऱ्यावर उचित कारवाई करा असे स्पष्ट आदेश दिले.
दरम्यान आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी या संदर्भात आमदार नितेश राणे यांच्या मागणी प्रमाणे कारवाई करून समाधानकारक निर्णय करून दिला जाईल अशा आश्वासन दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा