सावंतवाडी:
नवोदय विद्यालय सांगेली या विद्यालयातील मुलांना डोळ्याचा आजार दिसून आला. या विद्यालयात 450 विद्यार्थी सहावी ते बारावी पर्यंत शिक्षण घेत आहेत. सावंतवाडीतील माजी नगरसेवक व हितवर्धक मंच अध्यक्ष सुरेश भोगटे यांच्या पुढाकाराने या मुलांच्या डोळ्याच्या आजारावर उपचार चालू केलेत. नॅब नेत्र रूग्णालाच्या माध्यमातून मोफत डोळे तपासणी शिबिर आयोजित करत 150 हून अधिक मुलांच्या डोळ्यांमध्ये ड्रॉप औषधे टाकून उपचार करण्यात आले.
यात लक्ष्मण कदम आनंद आश्रम, अहिल्या मेडिकल व वेलनेस मेडिकल तसेच सत्यजित धारणकर, महेश नार्वेकर, अनंत उजगावकर यांचे सहकार्य लाभले. यावेळी माजी नगरसेवक सुरेश भोगटे, प्राचार्य एम के जगदीश, जे बी पाटील, एस पी हिरेमठ, एम ए खान, डॉक्टर सिताराम नागोरे, दिपाली कदम आश्विनी अर्जुन सुकी आदी उपस्थित होते.