You are currently viewing गोवा ते जर्मनी व्हाया कांदिवली……प्रवास अतुट नात्याचा आणि प्रेम, ममता आणि मायेचा…..

गोवा ते जर्मनी व्हाया कांदिवली……प्रवास अतुट नात्याचा आणि प्रेम, ममता आणि मायेचा…..

दिसायला एरवीसारखा दिसणारा हा फोटो आणि व्हिडिओ….
अनोखी प्रेमकहाणी ऐकुन मीसुद्धा थक्क झालो.
प्राण्यांवरचं माणसांचं प्रेम काय असतं हे वेळोवेळी आपण बघतो, ऐकतो .
त्यातलीच ही कहाणी जी रंगली कांदिवलीच्या समता नगरमध्ये बाबा वारंग यांच्या इमारतीत अगदी खालच्याच मजल्यावरच्या फ्लॅटमधे.

मुळात या कुत्रीचे नावही माहित नाही नि त्याची गरजही नाही.
हिचा जन्म आपल्या इतर गावच्या कुत्र्यांसारखाच असावा आणि हिच्या मालकाने तिची लहानपणापासून देखभाल केली वाढवलं तिला अगदी पोटच्या पोराच्या मायेनेच.
हा तरुण गोवेकर एका रशियन मुलीच्या प्रेमात पडला. ( गोव्यात पर्यटक संशोधक म्हणुन जर्मनीहुन आलेल्या )
आणि हे प्रेम फुललं .कालांतराने मुलीवरच्या प्रेमामुळे या गोयकाराला गोवा सोडावं लागलं या कुत्रीला इथेच सोडून.
या कुत्रीची जबाबदारी घेतली ती शेजारच्या घरातील ब्रायन गोम्स या तरूणाने जो कांदिवलीला समता नगरमध्ये फोस्टर होम चालवतो अनाथ कुत्र्यांसाठी.( आज सात ते आठ अनाथ सोडलेले कुत्रे त्यांच्या या फ्लॅटमधे सांभाळतात )

यात भर पडली ती या कुत्रीची.
तीचा मालक त्या रशियन मुलीबरोबर जर्मनीला रहायला गेला मात्र एकाच अटीवर की त्याच्या या लाडक्या कुत्रीला तो जर्मनीत आणणार.
त्या रशियन जर्मन मुलीनेही ती अट मान्य केली कारण गोव्यातल्या वर्षभराच्या वास्तव्यात तीचाही या मुक्या जीवाला‌ लळा लागला होता .
आणि ही इच्छा होती ती अपुरीच राहिली या कोरोनाच्या जगभरातल्या लाॅकडाऊनमुळे. तब्बल आठ महिने फेब्रुवारी ते ऑक्टोबर ही मोठी ताटातूट झाली .
या मुक्या जीवाची आणि या दोन प्रेमवीरांची ही ताटातूट दोन्ही बाजुनां अस्वस्थ करणारी ठरली.
याकाळात या समता नगरच्या ब्रायन गोम्सने पोटच्या मुलाप्रमाणे स्वतःच्या पेट प्रमाणे सांभाळलं खाऊ पिऊ न्हाऊ घातलं.

शेवटी इंटरनॅशनल एअरपोर्ट व वाहतुक सुरू झाली आणि तीला जर्मनीला न्यायच्या हालचाली जोरात सुरू झाल्या.
मुंबईतुन ब्रायन गोम्सनी सर्व कागदपत्रे तयार केली आणि कार्गो एअरलाईन्समधुन या कुत्रीचा प्रवास निश्चित झाला .
बुकिंग झालं .
आणि तो दिवस उजाडला .
साधारण अठरा वीस तासांचा हा प्रवास हा मुका जीव एकटीने करणार होती .

हजारो किमी दूर असलेल्या आपल्या लाडक्या मालक मालकिणीला भेटायला परदेशी चालली होती ही .
आणि शेवटी सर्व योग्य काळजी घेत प्रवास सुरू झाला , सुखरूप झाला आणि एअरपोर्टवरून तीला या मालक मालकिणीच्या ताब्यात द्यायचा तो क्षण फोटो आणि व्हिडियोत टिपला गेला .
ती जेव्हा त्या कार्गो लिफ्ट मधुन बाहेर येतै तो क्षण बघा ती आठ महिन्यांनी कशी आपल्या नविन मालकिणिला आणि मालकाला ओळखते. गळ्यात पडते
या जगात या कठिण काळात माणुस माणसाला विसरला .
पण या मुक्या जीवाला‌ ना तीचा मालक विसरला ना ती परदेशी मालकीण विसरली. किती खर्च त्यानीं हे नातं जपण्यासाठी केला असेल असा विचार काही लोकांच्या मनातही येईल.
पण ज्या क्षणाला तो मुका जीव त्या जर्मन रशियन मालकिणीला बिलगला , त्याच क्षणाला ते सारे वसुल झाल्याचे वाटेल.
प्रेमाची आणि मुक्या जीवाच्या मायेची अशी पैंशांत किंमत होत नाही हेच खरं
सलाम त्या मुक्या जीवाला जी आठ महिने या भेटीसाठी इथे अनोळखी मुंबईत राहिली इतर अनाथ कुत्र्यांबरोबर .
एकाच आशेवर….कधी ना कधी ती जाऊन आपल्या मालकाला भेटेल.
काय विचार तिच्या मुक्या मनात आले असतील या काळात?
कदाचित वाटलंही असेल तीला कि सोडून दिलं असेल मालकाने…इथेच तीला.
आणि सलाम त्या गोयकार मालक मालकिणीला जे तीला आठ महिन्यात विसरलेही नाहीत आणि इतका खर्च करून घेऊन गेले स्वतःकडे.
हॅट्स…ऑफ …

आणि त्या ब्रायन गोम्स बद्दल तर शब्दच नाहीत ज्याने तीला या कठिण काळात गोव्याहून मुंबई कांदिवलीत आपल्या घरी आणलं, सांभाळलं आणि पोचतंही केलं जर्मनीला तीच्या लाडक्या मालक मालकिणीकडे.
हे असे मुके जीव सांभाळणारे दाते म्हणुनच तर जन्मदात्री पेक्षाही श्रेष्ठ वाटतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा