सिंधुर्गात १५६ केंद्रे सुरू होणार
सिंधुदुर्गनगरी:
जय जवान जय किसान हा नारा खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्ष व देशाचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्थ ठरविला आहे. या सरकारने गेल्या 9 वर्षात शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवून शेती व शेतकऱ्यांना प्रेरणा दिली आहे. देशातील साडेआठ कोटी शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेचा लाभ दिला आहे. उद्या 27 जुलै रोजी या योजनेचा चौदाव्या हप्त्याचे वितरण व शेतकऱ्यांसाठी एका छताखाली सुविधा देणाऱ्या सव्वा लाख प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत.
सिंधुदुर्गातील शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना 14 वा हप्ता याच कार्यक्रमात वितरित होणार आहे. तर सिंधुर्गातील 156 प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रे गुरुवारी या उद्घाटन सोहळ्यानंतर खुली होत आहेत, अशी माहिती बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली.यावेळी भाजप नेते माजी आमदार राजन तेली, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी कुडाळ तालुका भाजपा अध्यक्ष दादा साईल आधी पदाधिकारी उपस्थित होते.
*पंतप्रधान मा नरेंद्रभाई मोदी शेतकऱ्यांशी साधणाऱ्या सुसंवादाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा लाभ : भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत*
14429 केंद्रे महाराष्ट्र राज्यात तर 156 केंद्रे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू होत आहेत.156 केंद्रांपैकी 16 केंद्रे ही ब्लॉक लेव्हल तर 140 केंद्रे ही ग्राम पातळीवरची आहेत. सद्यस्थितीत शेतक-यांना शेतीसाठी लागणारी बी-बियाणे, औषधे, औजारे, खते यांच्या खरेदीसाठी तसेच मातीपरीक्षण, संशोधन आणि मार्गदर्शनासाठी वेगवेगळ्या दुकानात किंवा संस्थांमध्ये जावे लागते. ‘पंतप्रधान किसान सुविधा केंद्र’ ही योजना शेतक-यांना या सर्व सेवा सुविधा एकाच ठिकाणाहून पुरविण्यासाठी सुरू करण्यात येत आहे.एकाच ठिकाणी बी-बियाणे, औषधे, औजारे व खते उपलब्ध झाल्यामुळे त्यांची धावपळ वाचणार आहे.
किसान सन्मान योजनेतून शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट मदत, खत आणि औषधांसाठी देण्यात आलेले अभूतपूर्व अनुदान, पंतप्रधान प्रणाम योजनेतून शेती आणि माती रक्षणासाठी घेण्यात आलेले धोरणात्मक निर्णय यानंतर “पंतप्रधान किसान समृद्धी केंद्रां”चा निर्णय शेतकऱ्यांच्या आयुष्यात क्रांतिकारक बदल घडवून आणत आहेत. पीएम किसान समृद्धी केंद्रातून एकाच छताखाली अनेक सुविधा उपलब्ध होतील. शेती म्हटली म्हणजे खते, माती, बियाणे, औषधे आलीच. अनेकदा ती महागड्या किमतीत उपलब्ध होतात. शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे बियाणे मिळत नाही. त्यात शेतकऱ्यांची अनेकवेळा फसवणूक होते. योग्य मार्गदर्शन मिळत नाही. शेतकऱ्यांच्या या समस्या विचारात घेऊन त्यांची स्थिती सुधारावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला पीएम किसान समृद्धी केंद्राची भेट दिली आहे