You are currently viewing नारींग्रे येथील तरुणाचा ओहोळात आढळला मृतदेह…

नारींग्रे येथील तरुणाचा ओहोळात आढळला मृतदेह…

देवगड

नारींग्रे बावकरवाडी येथील तरुणाचा मृतदेह शेत मांगराच्या जवळ असलेल्या ओहोळात आढळून आला. हा प्रकार आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास उघड झाला. मंगेश शांताराम शिंदे (वय ४५) असे त्यांचे नाव आहे. त्यांचा नेमका मृत्यू कसा झाला, हे अद्याप कळू शकले नाही. याबाबत देवगड पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगेश हा नेहमी नारींग्रे सडा गायगोठण येथे असलेल्या त्यांच्या शेतमांगरात रात्री झोपायला जात असे. सोमवारी रात्री जेवण करून नेहमीप्रमाणे ते शेतमांगरामध्ये झोपण्यास गेले होते. त्यांचे वडील शांताराम बापू शिंदे हे मंगळवारी सकाळी ७ वा. सुमारास शेतमांगराकडे मुलासाठी चहा व नाष्टा घेवून गेले. यावेळी तो शेतमांगरात दिसला नाही म्हणून मांगराजवळ असलेल्या वहाळाकडे गेला असेल म्हणून पाहण्यास गेले यावेळी वहाळाच्या पाण्यात त्यांना मृतावस्थेत दिसला. त्यांनी याबाबत तात्काळ गावातील ग्रामस्थांना सांगितले. ग्रामस्थांच्या सहकार्याने पाण्यातून त्याला बाहेर काढण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाला होता. मंगेश हा अविवाहित होता. या घटनेची खबर शांताराम शिंदे यांनी देवगड पोलिस स्थानकात दिली असून तपास पोलिस उपनिरिक्षक सुधीर कदम करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा