जिल्ह्यातील अनुदानित क्रीडा प्रकाराच्या एकविध खेळ संघटनांची बैठक
सिंधुदुर्गनगरी
जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा आयोजनाच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यास्तरीय अधिकृत राज्य संघटनेशी संलग्न जिल्हा एकविध खेळ संघटनांचे अध्यक्ष, सचिव यांची बैठक जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दि. 28 जुलै 2023 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे आयोजित केली, असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी कळविलेले आहे.
या बैठकीस उपस्थित राहतांना जिल्हास्तर एकविध क्रीडा संघटना नोंदणी प्रमाणपत्र. जिल्हास्तर संघटना अधिकृत राज्य संघटनेला संलग्न असल्याचे पत्र सोबत आणावे.
पुढीलप्रमाणे खेळ प्रकारातील संबंधित खेळाच्या संघटनानी याची नोंद घ्यावी.
आर्चरी, ॲथलॅटिक्स, बॅडमिंटन, बॉलबॅडमिंटन, बेसबॉल, बास्केटबॉल, बॉक्सींग, कॅरम, बुध्दीबळ, आटयापाटया, क्रीकेट, सायकलिंग, डॉजबॉल, तलवारबाजी, फुटबॉल, जिमनॅस्टीक, हॅण्डबॉल, हॉकी, ज्युदो, वॉटरपोलो, कबड्डी, खो-खो, लॉनटेनिस, मल्लखांब, नेटबॉल, रायफल शुटींग, रोलबॉल, थ्रोबॉल, व्हॉलीबॉल, टेबल टेनिस, शुटींगबॉल, सिकई मार्शल आर्ट, सॉफ्टबॉल, स्कॅश, जलतरण डायव्हिंग, सेपक टकरा, सॉफ्टटेनिस, टेनिक्वॉईट, मॉडर्न पेंटॅथलॉन, रग्बी, वेटलिफ्टींग, कुस्ती, वुशु, योगासन, सुब्रतो फुटबॉल, नेहरु हॉकी.