*’संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि समकालीन महाराष्ट्र’ एक दिवसीय चर्चासत्र*
*मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाची सांगता*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय संचालित इतिहास संशोधन मंडळ आयोजित मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाच्या (१८९८ – २०२३) सांगतेनिमित्त ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि समकालीन महाराष्ट्र’ या विषयावर एक दिवसीय चर्चासत्राचे रविवार, ३० जुलै २०२३ सकाळी ९ ते संध्याकाळी ५:३० ह्या वेळात शारदा मंगल कार्यालय, तिसरा मजला, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर (पूर्व), मुंबई येथे आयोजन करण्यात आले आहे.
उद्घाटन सत्र सत्राचे प्रास्ताविक डॉ. दीपक पवार करणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षपद डॉ. भालचंद्र मुणगेकर भूषवणार आहेत. ‘महाराष्ट्राचा इतिहास आणि वर्तमान आंतरसंबंध’ या विषयानुसार डॉ. प्राची देशपांडे आपले विचार सभागृहासमोर मांडणार आहेत.
दिवसाच्या पहिल्या सत्रात ‘शेती आणि पर्यावरण’ या चर्चासत्रामध्ये ‘शेती’ सोमिनाथ घोळवे आणि ‘पर्यावरण’ परिणीता दांडेकर आपली भूमिका मांडतील. तर चर्चेत जास्वंदी बांबूरकर, साईली पलांडे दातार सहभागी होतील.
दिवसाच्या दुसर्या सत्रांमध्ये ‘शिक्षण, उद्योग आणि रोजगार’ या चर्चासत्रामध्ये ‘शिक्षण’ डॉ. शरद जावडेकर आणि ‘उद्योग आणि रोजगार’ डॉ. नीरज हातेकर आपले विचार मांडतील. तर चर्चेत डॉ. अवनीश पाटील, डॉ. नारायण भोसले सहभागी होतील.
दिवसाच्या शेवटच्या सत्रांमध्ये ‘प्रादेशिकता, संघराज्य व्यवस्था आणि भाषा धोरण’ या चर्चासत्रामध्ये ‘संघराज्य व्यवस्था’ डॉ. भालचंद्र मुणगेकर ‘महाराष्ट्रातील भाषा धोरण’ डॉ. प्रकाश परब आपले सखोल विचार सभागृहअत मांडतील. त्यावरील चर्चेत डॉ. श्रद्धा कुंभोजकर, डॉ. नीतीन रिंढे सहभागी होतील.
प्रत्येक सत्राच्या शेवटी सहभागींच्या प्रश्नांवर वक्ते उत्तरं देतील. तसेच सदर चर्चासत्र निःशुल्क असून उपस्थितांना प्रमाणपत्र दिले जाईल, असे कार्यक्रमाचे निमंत्रक तसेच मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे प्रमुख कार्यवाह रवींद्र गावडे आणि इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष डॉ. जयसिंगराव पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे. अधिक माहितीसाठी ९८२०४३७६६५ क्रमांकावर संपर्क साधू शकता.