*काव्यनिनाद साहित्य मंच पुणे समूहाच्या लेखिका कवयित्री योगिनी पैठणकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”प्रश्न”*
लाखो प्रश्न घेऊन
जगतो माणूस आयूष्यात
हे असे का? कोणामूळे?
कधी,कसे, केव्हा हेच तर जीवनात…
सोहं…ssss. ” मी कोण*”?
कधी विचारलेस का मनाला ?
असंख्य या प्रश्नांची ऊत्तरे
ठाऊक आहे फक्त देवाला…..
झाड, पाने, फूले ,झरा
सुर्य, चांदण्या, चंद्र ऊगवती अंबरा,
चीमणीला अन्न, हत्तीला सोंड
पाण्याची वाफ , नी बर्फ करतो हा वारा…..
कळीचे फुल,
आईला मूल,
कवितेला शब्दांची झूल
कधी मृगजळाचीही भूल…
असंख्य प्रश्न येती डोक्यात
अनंत विषय असती मनात
उत्तर शोधतो याच प्रश्नात
आनंद मिळतो मग जीवनात.!
योगिनी वसंत पैठणकर
नाशिक