You are currently viewing काँग्रेस पक्षाची विचार धारा तळागाळात पोहचवा – नागेश मोर्य

काँग्रेस पक्षाची विचार धारा तळागाळात पोहचवा – नागेश मोर्य

वैभववाडी तालुक्यात कॉंग्रेसची बैठक संपन्न

वैभववाडी

वैभववाडी तालुका राष्ट्रीय कॉंग्रेस ची बैठक वैभववाडी येथे संपन्न झाली या सभेला निरिक्षक म्हणून नागेश मोर्य यांनी मार्गदर्शन केले.

आगामी काळात होणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका लक्षात घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षक बावीस्कर यांच्या सूचनेवरून या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सिंधुदुर्ग जिल्हा कॉंग्रेस कार्यकरणीच्या बैठकीच्या वेळी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष इर्षाद शेख यांनी जिल्हा उपाध्यक्ष नागेश मोर्ये यांची वैभववाडी तालुका निरक्षिक म्हणून नेमणूक केली होती.

या नुसार आजची बैठक ही जिल्हा उपाध्यक्ष नागेश मोरे व जिल्हा सरचिटणीस प्रवीण वरुणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सदर बैठक ही सिंधुदुर्ग जिल्हा कॉँग्रेस अध्यक्ष इर्षाद शेख यांच्या आदेशावरून घेण्यात आली.

या बैठकीत बोलताना सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष नागेश मोर्ये यांनी कॉँग्रेस पक्षाची विचार धारा तळागाळात पोहचवणे आवश्यक असून या साठी पक्ष संघटना वाढीवर भर देणे गरजेचे असल्याचे सांगितले.कॉँग्रेस पक्ष घराघरात पोहचवण्यासाठी सर्वानी एकजूट होऊन कामाला लागण्याचे आव्हान देखील त्यांनी केले.
जिल्हा सरचिटणीस प्रवीण वरुणकर यांनी देखील तालुक्यामध्ये डिजिटल स्वरूपात कॉँग्रेस सदस्य नोंदणी करण्यासाठी मोहीम चालवली जाईल असे सांगितले. यासाठी पंचायत समिती नुसार आपण नियोजन करून मोठ्या प्रमाणात कॉँग्रेस पक्षाची सदस्य नोंदणी करून घेण्याचे निश्चित केले गेले. यावेळी प्रत्येक पंचायत समितीसाठी एक मंडल कमिटी स्थापन करण्यात आली असून येणाऱ्या निवडणुकीची जबाबदारी या कमिटी कडे देण्यात आली आहे.
या कार्यक्रमासाठी तालुक्यातून तालुकाध्यक्ष दादामिया पाटणकर, जिल्हा सचिव मीनाताई बोडके, रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे जिल्हा अध्यक्ष गुलजार काझी,जिल्हा उपाध्यक्ष आनंद पवार , युवा तालुका अध्यक्ष भालचंद्र जाधव, महिला तालुका अध्यक्ष प्रांजली जाधव , सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष प्रकाश जाधव , तालुका सरचिटणीस श्रेया मुद्रस , तालुका उपाध्यक्ष वसंत नाटेकर , अहमद बोबडे, वासिम काझी ,दिलीप राणे, सिद्धार्थ कांबळे, दत्तात्रय श्रीधर इंदप इत्यादि पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा