दोडामार्ग
नियतीलाही ते मान्य नव्हतं म्हणूनच की काय ऐन दिवाळीत बोर्डेकर कुटूंबावर मोठं संकट कोसळलं.
बोर्डेकर यांच्या अकाली निधनामुळे दोडामार्ग तालुका वासीयांनी एक ज्येष्ठ मार्गदर्शक गमावल्याची खंत आज दोडामार्ग येथे झालेल्या शोकसभेत सर्वपक्षीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते महादेव उर्फ बाबी बोर्डेकर यांचे अल्पशा आजाराने रविवारी आकस्मिक निधन झाले होते. आज दोडामार्ग पिंपळेश्वर हॉलमध्ये त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या काही इच्छा अपुऱ्या असून त्या आपणास पूर्ण केल्या पाहिजेत असे सर्वच वक्त्यांनी यावेळी स्पष्ट करताना त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून “बाबी” च्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी श्रद्धांजली वाहिली.
सामाजिक, राजकीय, कला- क्रीडा,सांस्कृतिक, सहकार अशा विविध क्षेत्रात त्यांचा दरारा होता, ते पक्षनिष्ठ राजकारणी तसेच स्पष्टवक्ते होते, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेशभाई दळवी यांचे ते निकटवर्तीय होते, तसेच त्यांनी अखंड सावंतवाडी तालुका असताना उपसभापती पदही भूषवले होते. सेवा सहकारी सोसायटी, तंटामुक्त समिती, पाणी मागणी समिती, लाकूड व्यापारी समिती यांसारख्या अनेक समित्यांचे ते सदस्य होते. त्यांच्या जाण्याने न भरून निघणारी पोकळी निर्माण झाल्याची यावेळी सर्वपक्षीय कार्यकर्ते म्हणाले. तर डोळ्यात अश्रू आणि ओघळत्या भाषाशैलीने सूत्रसंचालन करताना प्राध्यापक संदीप गवस यांनी महादेव उर्फ बाबी बोर्डेकर यांचा जीवनपट उपस्थितांच्या समोर उभा केला यावेळी मात्र सगळ्यांचे डोळे पाणावले होते.
यावेळी ज्येष्ठ नेते सुरेशभाई दळवी, माजी सभापती भगवान देसाई, उद्योजक कृष्णा पालयेकर, प स उपसभापती धनश्री देसाई, शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी, प्रेमानंद देसाई, भाजपा तालुकाध्यक्ष प्रविण गवस, उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण, रंगनाथ गवस, प्रविण परब, सुदेश तुळसकर, प्रदीप चांदेलकर, सुर्या गवस, केशव धाऊसकर, चंद्रशेखर देसाई, चंदू मळीक, राजेंद्र निंबाळकर, प्रशांत नाईक, एम.डी. धुरी, लखु खरवत, केशव रेडकर, अनिल मोरजकर आदी अनेकानी यावेळी बाबी बोर्डेकर यांच्या आठवणींना उजाळा दिला.