“तुम्ही प्रस्ताव द्या, बाकी मी आहे”…असा आत्मविश्वास अंगी बाळगणारे पेंडूर जिल्हा परिषद मतदारसंघातील माजी जिल्हापरिषद वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर यांचा २३ जुलै हा वाढदिवस… आपल्या कार्यातूनच लोकांच्या मनावर राज्य करणारे नेतृत्व म्हणून संतोष साटविलकर ओळखले जातात. मालवण पंचायत समिती सदस्य म्हणून देखील संतोष साटविलकर यांनी कार्यकाळ भूषविला होता.
पेंडूर जिल्हापरिषद मतदारसंघातील कामांना कोणत्याही प्रस्तावाची गरज नाही, तुम्ही प्रस्ताव द्या बाकी मी आहे, असं सांगत प्रस्ताव येताच तो मंजूर करून प्रत्यक्षात काम पूर्णत्वास नेईपर्यंत सर्व जबाबदारी संतोष साटविलकर स्वतःवर घ्यायचे.
सिंधुदुर्ग जिल्हापरिषदेतील अधिकारी काम करत नाहीत अशी इतर सदस्य, लोकप्रतिनिधी कारणे देत असताना, अधिकारी वर्गाकडून कसे काम करून घ्यायचे याचे जिवंत उदाहरण म्हणजे संतोष साटवीलकर. पेंडूर दलित वस्ती मधील लोकांचे रस्ते, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असो वा सरकारची घरकुल योजना, लोकांची करारपत्र, झेरॉक्स, आदी कागदपत्रे स्वतःच्याच खिशातून तयार करून प्रस्ताव मंजूर करणे, कामे करून घेणे आणि लोकांना एकही रुपया खर्च होणार नाही याची काळजी घेणारे हक्काचे नेतृत्व म्हणजे संतोष साटविलकर.
आपल्या मतदारसंघातील गावडे समाजाच्या वाडीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असताना, त्यांना समजल्यावर स्वतः त्या वाडीत जात, १५ दिवसात आपले रस्ता, पिण्याच्या पाण्याची तळी हे प्रश्न सोडवून आणण्याची जबाबदारी माझी, असा शब्द देत प्रस्ताव करून तो प्रश्न १५ दिवसात त्यांनी सोडवून दाखवला.
आपला प्रतिनिधी ज्याला आपण निवडून जिल्हा परिषदेवर पाठवलं तो कसा असावा…त्याचं नेतृत्व कसे असावे याचा एक आदर्शवत नमुना म्हणजे संतोष साटविलकर. कोणाचीही वैयक्तिक कामे असो वा सामाजिक, स्वतः समोरच्या व्यक्तीला फोन करून त्याबाबत प्रस्ताव देण्यास सांगून कामे मार्गी लावण्याची धमक असणारे पेंडूर जिल्हा परिषद मतदारसंघातील खमके नेतृत्व म्हणून संतोष साटविलकर यांची ओळख आहे. आजही मतदारसंघातील अनेक ग्रामपंचायत सदस्य आवर्जून संतोष साठविलकर यांच्या कार्याचा आपल्या मुखातून गौरव करतात. पेंडूर गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य शेखर फोंडेकर यांनी संतोष साटविलकर यांची काम करण्याची हातोटी कशी आहे, कसे ते सहजपणे हाती घेतलेले काम करून आणतात याचा लेखाजोखाच संवाद मीडियाच्या प्रतिनिधिकडे मांडला. आपल्या मतदारसंघात कोणीही व्यक्ती पायाभूत सुविधांपासून वंचित राहू नये, वाडी वाडीमध्ये रस्ते, पाणंद, पायवाटा, रिटर्निंग वॉल मंजूर करून पूर्णत्वास नेणे ही तर संतोष साटविलकर यांची हातोटी होती. प्रसंगी ते स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून कामे करून घ्यायचे. त्यामुळे जनमानसात त्यांचे वेगळे स्थान निर्माण झाले. त्यांची काम करण्याची पद्धतच वेगळी होती, काम हाती घेतले म्हणजे तिथे अडचण येवो अथवा काहीही होवो, काम पूर्ण होणारच हा त्यांच्या कामावर लोकांचा विश्वास होता.
जनतेच्या सुखासाठी झटणाऱ्या अशा या समाजप्रिय….जनतेच्या हृदयातील नेतृत्वाचा आज वाढदिवस… त्यांच्या मतदारसंघातील जनतेच्या वतीने संवाद मिडियाकडून त्यांना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा… आणि भावी वाटचालीस सदिच्छा…!! 💐💐
🌹शुभेच्छुक🌹
*ग्रामपंचायत वरची गुरामवाडी*
*सरपंच – श्री. शेखर पेणकर*
*उपसरपंच – श्री. धोंडी कामतेकर*
*ग्रामसेवक – श्री. लक्ष्मण सरमळकर*
*सदस्य – श्री. विलास बांदेकर, श्री. वंदेश ढोलम, श्री. प्रशांत टेंबुलकर, सौ. मयुरी कुबल, सौ. संपदा वालावलकर, सौ. विद्या गिरकर, सौ. सुप्रिया गुराम, सौ. श्रद्धा गुराम*
*सर्व कर्मचारी वृंद*
——————————————————————–
*श्री. सिद्धार्थ (सिद्धू )राजन पेणकर*
गव्हर्मेंट रजिस्टर कॉन्ट्रॅक्टर
कट्टा, मालवण
——————————————————————–
*लक्ष्मीनारायण फूड प्रोडक्ट्स*
कट्टा वाईरकरवाडी
प्रो. प्रा. नंदू वालावलकर
——————————————————————–
*श्री. सागर माळवदे*
गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर,
कट्टा मालवण
——————————————————————–
*श्री. मनोज मधुकर वायंगणकर*
सिव्हिल इंजिनिअर अँड गव्हर्मेंट रजिस्टर कॉन्ट्रॅक्टर
बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स
सुकळवाड, मालवण
——————————————————————–
*रामेश्वर आर्ट्स*
आमच्याकडे ऑर्डर प्रमाणे शाडूच्या व मातीच्या गणेश मूर्ती बनवून मिळतील.
पत्ता – एस टी स्टँड समोर, कट्टा
*मंजुषा ज्वेलर्स*
प्रो. प्रा. मंगेश आचरेकर
पत्ता – एस टी स्टँड समोर, कट्टा
——————————————————————-
*संजीवन मेडिकल अँड जनरल स्टोअर्स*
पत्ता-कट्टा, ता. मालवण,जि.सिंधुदुर्ग.
*प्रोपा.उल्हास सिताराम कांबळी*
——————————————————————–
*कोरगावकर कोकणी मेवा*
👉 आमच्याकडे कोकम सरबत, आवळा सरबत, कैरी पन्हे, मँगो पल्प, मालवणी खाजा, मालवणी मसाले, सर्व प्रकारचे लाडू मिळतील.
👉 तसेच प्रसिद्ध लाकडी खेळणी मिळतील.
*कोरगावकर स्नॅक्स सेंटर*
*घ्या चटकदार वडापावचा आस्वाद*
वडापाव, गोलभजी, कांदाभजी, गोबी मंचुरियन मिळेल.
पत्ता – कट्टा, मालवण