You are currently viewing श्रावण हळवा

श्रावण हळवा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री वंदना दर्यापूरकर- चवरे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*श्रावण हळवा*

 

सजल मेघ श्रावणांतले

का पापणीवर ओठंगले

 

दूर देशीच्या सख्याला साद

श्रावणांत भिजे अंतर्नाद

 

क्षितिजापल्याड उंच जाई

सावर झोका मनाचा बाई

 

श्रावण सावळा घनश्याम

गोऱ्या राधेचे गोकुळधाम

 

चिंब ओल्या आठवांचे गाव

श्रावण हळवा त्याचे नाव..

 

 

*वंदना दर्यापूरकर-चवरे अमरावती*

प्रतिक्रिया व्यक्त करा