You are currently viewing पूरस्थितीत मदत करण्यासाठी ९ जणांची रेस्क्यू टीम सज्ज..

पूरस्थितीत मदत करण्यासाठी ९ जणांची रेस्क्यू टीम सज्ज..

उभादांडा ग्रा.पं.सरपंच निलेश चमणकर यांची संकल्पना..

वेंगुर्ले

उभादांडा ग्रामपंचायतच्या वतीने व सरपंच निलेश चमणकर यांच्या संकल्पनेतून पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत पूरस्थितीत मदत करण्यासाठी ९ जणांची रेस्क्यू टीम कार्यरत करण्यात आली आहे. याबाबत वेंगुर्ले तहसीलदार व वेंगुर्ले पोलीस स्टेशन यांना सरपंच निलेश चमणकर यांनी पत्र दिले आहे.

या रेस्क्यू टीम मध्ये उभादांडा गिरपवाडी मुठ येथील एकूण ९ अनुभवी लाईफ गार्ड यामध्ये ललित सतीश गिरप, सदाशिव पांडुरंग गिरप, करण एकनाथ तांडेल, पूर्वेश् हेमंत तोरसकर, रावजी वामन आरावंदेकर, सुरज रमाकांत तोरस्कर, हर्षद अशोक सावंत, लक्ष्मीकांत कृष्णा केळुस्कर व मंदार गिरीश मसुरकर हे समाविष्ट आहेत. हे सर्व गोवा येथे लाईफ गार्ड म्हणून कार्यरत असून आपत्कालीन परिस्थितीत पाण्यात बुडणाऱ्याला वाचवण्याचा चांगला अनुभव असून त्यांच्याकडे एकूण १५ लाइफ जॅकेट उपलब्ध आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात जरी कोणत्याही भागात आपत्कालीन परिस्थिती पूरस्थिती उद्धवल्यास ते उपलब्ध असणार आहेत.आवश्यकता भासल्यास निलेश चमणकर (9423301106),ललित गिरप (7798721190)

यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत तहसीलदार ओंकार ओतारी यांनी अशा रेस्क्यू टीम स्तुत्य उपक्रम असल्याचे म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा