दोडामार्ग
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेनेच्या डेगवेतील कार्यकर्त्यांनी डेगवे गावातील (ता.सावंतवाडी) सर्व शेतकरी बांधवांना नारळ,सुपारी आणि काजू कलमाच्या रोपांचे वाटप शुक्रवारी केले आहे.रोपे वाटपाचा कार्यक्रम श्री स्थापेश्वर मंदिराजवळ झाला.
यावेळी डेगवे आंबेखणवाडी, जांभळवाडी,फणसवाडी, बाजारवाडी, मोयझरवाडी,वराडकरवाडी,मिरेखणवाडीतील सर्व शेतकरी बांधवांनी लाभ घेतला.
या कार्यक्रमात पावसाळ्यातील रानभाज्या व त्याचे फायदे या विषयावर दापोली कृषी विद्यापिठामध्ये प्रशिक्षण घेणारे पवन विवेक केसरकर यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली.
शिवसेनेचे उपतालुका प्रमुख तथा डेगवे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मंगलदास देसाई यांच्या व गावातील शिवसेनेच्या कार्यकर्त्याच्या पुढाकाराने कार्यक्रम् संपन्न झाला.
यावेळी डेगवे ग्रामपंचायतीचे सदस्य तथा उपविभाग प्रमुख विजय देसाई,माजी सरपंच वैदेही देसाई,वैष्णवी केसरकर,वामन देसाई,योगेश मांजरेकर,विवेक केसरकर,अनिल देसाई शाखा प्रमुख सीताराम देसाई,सदस्य रुपाली देसाई व आजी माजी ग्रामपंचायत सदस्य,व डेगवे ग्रामस्थ उपस्थित होते.