*काव्यनिनाद साहित्य मंच पुणे समूहाच्या ज्येष्ठ सदस्या लेखिका कवयित्री प्रतिभाताई पिटके लिखित अप्रतिम काव्यरचना*
*प्रश्न*
प्रश्न असा माझ्या मना
सांगू किती कसे कुणा!
कोण निर्मी चंद्र तारे
वाहताती मंद वारे
सृष्टी सारी बघतांना
दिशा मिळे विचारांना–
प्रश्न असा माझ्या मना ……१
कसे उपजले जीव?
मृत्यू ओलांडितो शीव
इथे तिथे पाहतांना
थक्क व्हावे नयनांना
प्रश्न असा माझ्या मना-……२
सोडुनिया घरदार
जग सारे फिरणार
गूढ अर्थ सांगताना
कष्ट होती साधकांना
प्रश्न असा माझ्या मना….३
कोण देई प्राणवायू
हाती कोणाच्या हो आयु
काही मला समजेना
देव कुठे उमगेना
प्रश्न असा माझ्या मना ……४
सणवार भारतात
नाही कधी विदेशात
धाक देवाचा हिंदूंना
नाही कधीच गोऱ्याना
प्रश्न असा माझ्या मना
सांगू किती कसे कुणा
प्रतिभा पिटके
अमरावती
( माझी स्वरचित रचना)