You are currently viewing लग्न

लग्न

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री अंजली दीक्षित-पंडित लिखित अप्रतिम लेख*

*लग्न…!*

देव दिवाळीनंतर म्हणजेच तुळशीच्या लग्नानंतर लग्नाळू घरांना लग्नाचे वेध लागतात. पण त्यातल्या त्यात लग्नासाठी लोकप्रिय महिना म्हणजे मे महिनाच. रखरखीत उन्हात एसटीनं, कारनं किंवा सीटर ठरवून दूर असो वा जवळ घरातलं एक जण तरी (दूरच्या नात्यातलं? सासरचं का माहेरचं यावरून कोण कुठे जाणार हे ठरतं) लग्नाला हजेरी लावतोच. घरात मुला बाळांना सांभाळणारे कोणी नसेल तर सगळ्या कुटुंबाची वरात हॉलवर जाऊन धडकायची. पूर्वी पंधरा पंधरा दिवस लग्न घर पाहुण्यांनी भरलेलं असायचं. चेष्टा मस्करी, हास्य विनोद, चर्चेची गुऱ्हाळं, मानपनाचे बेत, मुलीकडचे लग्न असेल तर रुखवताची धामधूम, कपडे खरेदी,दागिने खरेदी असा खासमखास माहोल असायचा. आदल्या दिवशी कार्यालयात पोहोचणारे पाहुणे, दुसऱ्या दिवशी सकाळी येणारे पाहुणे, अक्षतांच्या वेळीच येणारे पाहुणे, इतर परिचित अशी विभागणी केली जायची. येणाऱ्या जाणाऱ्यांचं स्वागत, आहेर गजरे, ठेवणीतले अत्तरांचे सुगंध, सनईचे सूर, मंगलाष्टक, नवरा नवरी बरोबर स्टेजवर काढलेले फोटो, जेवणाच्या पंगतींवर पंगती, जिलेबी मठ्ठ्याचा आग्रह, घास भरवतानाची चेष्टा मस्करी ही तर लग्नकार्याची जान होती.साध्या सहज सुंदर सोहळ्याची किती किती मनोहारी रूप डोळ्यासमोरून जातात. कुठेही नाटकीपणाचा अभिनिवेश, कृत्रिम पणा यांचा लवलेशही नव्हता. रुसवे फुगवे होते, राग लोभ होता, देणघेणं होतं पण ते लग्न होतं… निव्वळ फोटोशूट साठी चाललेला फार्स किंवा दिखाऊपणा नव्हता.

आता लग्न सोहळ्यांनी कात टाकलेली आहे..असं म्हणण्यापेक्षा लग्नाचं स्वरूपच पूर्णपणे बदलून गेलय म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. वेडिंग प्लॅनर, डेस्टीनेशन वेडिंग, हवेतलं लग्न, डोंगरावर लग्न…अशा किती वेगळ्या आणि कुठल्या प्रकारे लग्न करून दाखवू असं झालंय लोकांना.सतत नाविन्याचं वेड लोकांना काहीतरी आगळं वेगळं,नजरेत भरेल असं, उठून दिसेल असं करायला भरीस पाडतय. बदल अपरिहार्य आहेच.काही चांगले तर काही वाईट बदल स्विकारावे लागतील नाहीतर अगदीच बाळबोध आणि आउटडेटेड असल्याचा शिक्का बसलाच म्हणून समजा.त्यातून लग्नकार्य म्हटलं की आपल्याकडील सुबत्तेचा,श्रीमंतीचा थाट मिरवण्याची गोष्ट, ही आयती चालून आलेली संधी कशी सोडावी कुणी? हिंदी चित्रपटातील आणि आता मराठीदेखील हिरो हिरोईन सारखे आपले किंवा आपल्या मुलामुलीचे लग्न हा एकमेवाद्वितीय सोहळा व्हावा,सगळ्यांचे डोळे दिपून जावेत,वाहवाचा गजर हवेत चालत रहावा..असं वाटणं ही वर्षानुवर्षे मनात दाबून ठेवलेल्या सुप्त इच्छांची पिल्ले असू शकतात. आणखी एक म्हणजे तिच्या मुलाचं लग्न अमूक ठिकाणी अशाप्रकारे झालं होतं तर मी त्यापेक्षा राजेशाही थाटात माझ्या मुलांचं लग्न लावून दाखवेन….ही वृत्ती.मग ३ स्टार,५स्टार हॉटेल्स बुक केली जातात पाहुण्यांसाठी.पंजाबी पद्धतीने ३-४-५ दिवस कुठले कुठले सोहळे नियोजित केले जातात.बरं हे सगळं नियोजन घरच्या लोकांनी केलेलं असेल,त्यातनं आनंद घेऊन असं नव्हे तर रीतसर एखाद्या गाजणाऱ्या वेडिंग प्लॅनर कंपनीला या सगळ्याच गोष्टींचं कंत्राट दिलं जातं.नवरा नवरी,त्यांचे भाऊ बहीण,आई वडील वगैरे वगैरे कोरिओग्राफर लावून गाण्यावर थिरकण्यासाठी नृत्याच्या स्टेप्स शिकून घेतात. या सगळ्या प्रकारात कहर असतो तो व्हिडिओ ग्राफर, फोटोग्राफर आणि दोन तीन मोठमोठ्या स्क्रीनवर चालू असलेल्या प्रीवेडिंगशूटच्या प्रदर्शनाचा. गुरूजींच्या हातातल्या नाड्या कधी फोटोग्राफर आणि शूटिंगवाल्यांच्या हातात गेल्या ते कुणालाच कळले नाही.बिनधास्तपणे हे लोक विधी चालू असताना थांबवू शकताता,मागे पुढे करू शकतात, पुन्हा पुन्हा ती पोझ घ्यायला लावू शकतात.
तर विषय होता आज कालच्या लग्न सोहळ्यांचा. अशा पद्धतीने फोटोग्राफर आणि शूटिंग वाले बिनधास्तपणे मुहूर्ताला आणि लग्नविधींना थांबवून पोझ घ्यायला लावू शकतात. हे तर लग्नाच्या दिवशीच चित्र असतं. लग्नापूर्वी नवरा नवरीचे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन फोटो आणि व्हिडिओ काढायची कल्पना कोणाला सुचली असेल बरं? प्रीवेडिंग शूट असं गोंडस नावही आहे त्याला. आता या फोटोग्राफीसाठी हटके ठिकाणही निवडली जातात. आवर्जून वेगळ्या कपड्यांची, दागिन्यांची खरेदीही केली जाते. पार्लर वाल्या आंटीला बरोबर नेले जाते. आणि कहर म्हणजे असे फोटो, व्हिडिओ लग्नाच्या दिवशी मोठ्या मोठ्या स्क्रीनवर दाखवले जातात. सिलेक्टेडच दाखवले जात असावेत पण तरीही ते सर्व वयोगटातल्या लोकांनी बघण्यासारखे असतात का? हा प्रश्न आहे. कारण बऱ्याच वेळा जवळच्या लग्नाला आपण सहकुटुंब जातो. कदाचित टीव्ही, सोशल मीडिया, ओटीटी आणि मोबाईलच्या अनिर्बंध वापरामुळे त्या स्क्रीनवर जे दाखवत आहे ते कुणाला अक्षेपार्ह वाटेनासही झालं असावं. पण एक साधा बेसिक प्रश्न हा आहे की लग्न जर ठरवून होत असेल तर लग्नाच्या आधी हे फोटोशूटचं फॅड हवे कशाला? आणखी वर त्याचं असं उत्तान प्रदर्शन मांडायलाच हवं का? लग्न म्हणजे सर्वांच्याच आयुष्यातला एकमेव अविस्मरणीय आणि अत्यंत महत्त्वाचा संस्कार आहे. हे स्पष्ट आहे की आजकाल साधेपणाने लग्न करणं हे मागासलेपणाचे समजले जाते. पण म्हणून तुमच्या दोघातल्या नाजूक क्षणांना, पहिल्या स्पर्शातल्या जादूला उत्कटतेनं अनुभवायचं सोडून तिसऱ्या माणसाच्या साक्षीनं ते क्षण कॅमेऱ्यात कैद करून त्याचा असा बाजार मांडणं योग्य आहे? असलं आपल्या जवळकीचं प्रदर्शन करणं खरंच प्रशस्त आहे का? एका सद्सदविवेक बुद्धीच्या माणसाला आपल्या हळुवार भावभावनांचे खुलेआम चाललेले असे प्रदर्शन मनाला खरंच टाचू नये? थोडं सुद्धा ओंगळवाण वाटू नये? की काळाच्या प्रवाहात असं वाहत जावं की भल्याबुऱ्याची जाणच मरून जावी? का ही पैशाची चढलेली धुंदी म्हणावी?
एखाद्यावेळी निसर्गरम्य वातावरणात जेव्हा आपण जातो तेव्हा त्यावेळी तिथल्या सौंदर्यात तन मन एकरूप होऊन मिसळून जाणं ही
आत्मानुभूती असते. ते वातावरण फक्त डोळ्यांनीच नाही तर शरीरानेही आपण पिऊन घेत असतो, आपल्या आत मध्ये साठवून ठेवत असतो. मग लक्षात येतं की ते कॅमेराबद्ध पण करूया. तेव्हा फोटोग्राफी करणं हे सहज आलेलं असतं.
माणसाच्या मनाला, शरीराला नैसर्गिक उत्कटता, भावुकता यांची एक देणगी मिळालेली आहे. परस्परांबद्दल वाटणाऱ्या आकर्षणामुळे प्रेम निर्माण झालेलं आहे. तो किंवा ती नुसती जवळ असली तरी हृदयाची जी धडधड वाढलेली असते त्यातली गंमत अनुभवावीच लागते. या आणि अशा नितांत सुंदर सुंदर भावनांना आणि फक्त दोघातल्या नाजूक खाजगी क्षणांना अगदी त्या दोघांनीच मन आणि देहाच्या तल्लीनतेत अनुभवणे हे पुढील पिढीच्या नशिबातच नाही की काय? काय म्हणावं या प्रगतीला? हे अंधानुकरण आपल्याला कुठल्या संस्कृतीकडे घेऊन चाललंय? का या फाजिल ट्रेंडच्या प्रवाहात आपण सगळंच गमावून बसणार आहोत?
इतर संस्कृतींना जेव्हा आपण कट्टर म्हणून बोल लावत असतो तेव्हा आपण आपली मूळं जाणून-बुजून उखडून टाकत आहोत हे कुठेतरी कधीतरी लक्षात घेणार आहोत का नाही? का त्यातही इतरांचाच हात आहे म्हणून फक्त गळे काढणार आहोत? इथे कुणालाही उपदेश वगैरे देण्याचा माझा अजिबात प्रयत्न नाही पण विचार करण्याची वेळ निघून जाण्याआधी आपण शहाणं व्हावं एवढेच. आपल्या हातात ज्या गोष्टी नाहीत त्याला आपण हातबल होऊन पहात राहणं हाच पर्याय असतो. पण ज्या गोष्टी आजही आपल्या हातात आहेत त्यांना तरी आपण योग्य वळण देऊ शकतोच, हो ना?

अंजली दीक्षित-पंडित
९८३४६७९५९६

*संवाद मिडिया*

🔰 *(MITM)*🔰
*मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट ओरोस, सुकळवाड*

*🧑🏻‍🎓प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!👩‍🎓*

*🎒10वी /12वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित एकमेव डिप्लोमा व अभियांत्रिकी महाविद्यालय*

*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्तआणि 💯 नोकरीची संधी*
*देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट डिप्लोमा व इंजिनिअरिंग कॉलेज* 👨‍🎓👩‍🎓

🧾 *उपलब्ध कोर्सेस*👇

◼️ *पदवी (इंजिनिअरिंग) अभ्यासक्रम*

♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷
♦️ *कॉम्प्युटर इंजिनिअरिंग*🖥️
♦️ *इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग*

https://sanwadmedia.com/99360/
◼️ *पदवीका (पॉलिटेक्निक)अभ्यासक्रम*

♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷

◼️ *पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ *B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )*
✅ *B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )*

*🔻📖प्रमुख वैशिष्ट्ये📖🔻*
*👉🏻१३ वर्षांची शैक्षणिक परंपरा*

*👉🏻अनुभवी व तज्ञ प्राध्यापक*
👉🏻 *राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन*
*👉🏻उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप*
🔬🧰

*💯 👷नोकरीची संधी 👍🏻👷*

🪪👩🏻‍🎓🧑🏻‍🎓
*स्कॉलरशिप*

*EBC/ EWS/OBC* *या प्रवर्गातील विद्यार्थ्‍यांना *50% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

🆓 *SC/ST/NT/SBC/VJ/DT* *या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

*🏣विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व कॅन्टीन सुविधा उपलब्ध*

*आजच आपला प्रवेश निश्चित करा…👍📝*

*आताच भेट द्या –👇🏻*

*सुकळवाड , सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ , ता- मालवण,जिल्हा -सिंधुदुर्ग (४१६५३४)जि. सिंधुदुर्ग*

*http://www.mitm.ac.in/*

*संपर्क -*📞
*02362-299195*

*9420703550*
*9987762946*,
*9819830193*,
*9423301564*,
*9029933115*

🪪 *सुविधा केंद्र*🪪
*(MITM)*
🔰 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट*🔰

*FC Code-3440*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/99360/
———————————————-

 

प्रतिक्रिया व्यक्त करा