मा.माजी मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रकांतदादा पाटील, मा.खा.नारायणराव राणे प्रदेश सरचिटणीस मा.रविंद्रजी चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती
सिंधु आत्मनिर्भर अभियानाच्या कामाविषयी मान्यवरांनी काढले गौरवोद्गार
मुंबई
माननीय पंतप्रधान नरेंद्र नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत हे अभियान सुरू केले आहे. या अभियानाअंतर्गत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना जाहीर केली आहे. रुपये 20,050 कोटी रकमेची ही योजना भारतातील खारे नीमखारे व गोड्या पाण्यातील मत्स्यसंवर्धन, त्यामुळे निर्माण होणारे रोजगार व सशक्त अर्थकारण यासाठी दिशादर्शक आहे. सदर योजनेचा प्रचार, प्रसार करण्यासाठी सिंधुदुर्ग भाजपाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना केवळ जिल्ह्यातल्या नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक इच्छुक लाभार्थी पर्यंत पोचावी यासाठी विशेष नियोजन केले आहे.
त्याचाच एक भाग म्हणून ‘नीलक्रांती’ या नावाने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेची माहिती पुस्तिका संपादित केली आहे.
काल मुंबई येथे मा.माजी मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते दादर येथील वसंत स्मृती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष मा चंद्रकांत दादा पाटील माजी मुख्यमंत्री श्री.नारायणराव राणे, प्रदेश सरचिटणीस माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण, विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर प्रदेश उपाध्यक्ष व आत्मनिर्भर भारत अभियानाचे प्रदेश संयोजक माधवराव भांडारी, मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आत्मनिर्भर भारत अभियानचे कोकण संयोजक अतुल काळसेकर, आम.नितेश राणे, आम.प्रसाद लाड, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना कोकण संयोजक रविकिरण तोरसकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना माहिती पुस्तिका लवकरच कोकणातील तसेच महाराष्ट्र मधील सर्व जिल्ह्यातील इच्छुक लाभार्थी पर्यंत पोहचविणार असल्याचे अतुल काळसेकर यांनी सांगितले. सदर पुस्तिका बरोबरच शासनाकडे सादर करण्यासाठी आवश्यक असलेला नोदणी अर्ज सोबत जोडलेला आहे.अधिक माहितीसाठी नीलक्रांती संस्था तसेच भाजपा तालुका कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन रविकिरण तोरसकर यांनी केले.