सिंधुदुर्ग:
जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होत असून 20 जुलै 2023 ऑरेज अलर्ट आणि 21 ते 22 जुलै रोजी यलो अलर्ट दिलेला आहे. आतापर्यतच्या पावसाच्या अंदाजानुसार ऑरेज अलर्ट देखील रेड अलर्ट होवून मोठ्या प्रामणात पाऊस पडू शकतो. तसेच पाटबंधारे विभागाकडून प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील सर्वच नद्या इशारा पातळीच्या समीप पोहोचलेल्या आहेत. रात्रभर पाऊस सुरु राहिल्यास नद्या धोका पातळी ओलाडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने 21 जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहिर करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थान प्राधिकरणाचे अध्यक्ष के. मंजुलक्ष्मी यांनी कळविले आहे.
यामध्ये सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित व विना अनुदानित शाळा सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये व आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था यांचा समावेश आहे.