You are currently viewing सावंतवाडी येथे उद्या ‘अभियांत्रिकी क्षेत्रातील करिअर व प्रवेश प्रक्रिया..” यावर मार्गदर्शन’

सावंतवाडी येथे उद्या ‘अभियांत्रिकी क्षेत्रातील करिअर व प्रवेश प्रक्रिया..” यावर मार्गदर्शन’

यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे आयोजन…

सावंतवाडी

येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या वतीने उद्या गुरुवार, दि.20 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजता ‘अभियांत्रिकी क्षेत्रातील करिअर व प्रवेश प्रक्रिया’ या मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे._
_अभियांत्रिकी पदवी प्रवेश प्रक्रियेकरिता विकल्प अर्ज भरण्याची फेरी – कॅप राऊंड उद्यापासून सुरू होत असून त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांसाठी या मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ.रमण बाणे हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील._
_प्रवेश प्रक्रियेचे विकल्प अर्ज मोफत भरण्याची सोय देखील यावेळी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असेल. सत्राला उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सावंतवाडी बस स्थानक ते कॉलेजपर्यंत येण्यासाठी वाहतूक सुविधा कॉलेजतर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे._
_तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शन सत्राचा लाभ घ्यावा असे आवाहन कॉलेजतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी प्रा.दीपक पाटील – मोबा. 9421718850 यांचेशी संपर्क साधावा._

प्रतिक्रिया व्यक्त करा