मालवण
मालवण येथील आस्था ग्रुपतर्फे दि.१३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता देशभक्तीपर समूह गीतगायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा मालवण शहरातील रेवतळे प्राथमिक शाळेत होणार आहे. ही स्पर्धा तीन गटात घेण्यात येईल. पहिली ते चौथी, पाचवी ते दहावी आणि महाविद्यालयीन अशा गटात स्पर्धा होणार आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना पहिल्या गटासाठी अनुक्रमे ५०१ व ३०१ रु., दुसऱ्या गटासाठी २००१ व १००१रु., तिसऱ्या गटासाठी ३००१ व २००१ रु. तसेच सर्व गटांसाठी चषक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धेत प्रत्येक संघात वाद्यवृंदासह कमीत कमी ७, तर जास्तीत जास्त १५ स्पर्धक विद्यार्थी असावेत. सादरीकरणासाठी दहा मिनिटे कालावधी आहे. सहभागी संघांनी वाद्यवृंदाची व्यवस्था स्वतः करावी. सहभागी होणाऱ्या संघांनी आपली नावे सौगंधराज बांदेकर (९४२००२२८९०) यांच्याकडे द्यावीत. स्पर्धेत शहरासह तालुक्यातील जास्तीत जास्त शाळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष उमेश मांजरेकर, सचिव मनोज चव्हाण यांनी केले आहे.