ठेवीदारांना मिळणार दिलासा; अजित नाडकर्णी
फोंडाघाट
सावंतवाडी अर्बन बँक लिक्वीडेशन मध्ये गेल्याने ग्राहकांचे हाल होत आहेत. पैसे मिळत नसल्याने शेतीच्या कामात अडचण येत आहेत.याकडे अजित नाडकर्णी यांनी आमदार नितेश राणे यांचे लक्ष वेधले. दरम्यान, नितेश राणे यांनी बँकेच्या ठेवीदारांना दिलासा दिला जाईल असा विश्वास व्यक्त केल्याचे नाडकर्णी यांनी सांगितले.
आमदार दिपक केसरकर जबाबदार असुन आपण माजी संचालक म्हणून दिपकभाईंना कल्पना दिली होती.अन्यथा १५ आॅगस्टला फोंडाघाट शाखेसमोर मला लोकांसाठी आंदोलन करावे लागेल.असा इशाराही दिला होता.
दरम्यान आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून बँकेच्या ठेवीदारांना दिलासा मिळेल असा विश्वास नाडकर्णी यांनी वक्त केला.