You are currently viewing कोंकण विकास आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा तर्फे मुंबई विक्रोळी येथे मोफत आरोग्य शिबीर

कोंकण विकास आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा तर्फे मुंबई विक्रोळी येथे मोफत आरोग्य शिबीर

मसुरे

 

कोंकण विकास आघाडी सिंधूदुर्ग जिल्हा ने कोंकण विकास आघाडी विक्रोळी विधानसभेच्या सहकार्याने फोर्टिस हॉस्पिटल च्या मदतीने कोंकण विकास आघाडी मुंबई अध्यक्ष श्री सुहास आडीवरेकर यांच्या मार्गदर्शनात रविवार दिनांक 16 जुलै रोजी विक्रोळी विद्यालय, विक्रोळी पूर्व येथे मोफत आरोग्य शिबीर आयोजित केले होते. या शिबिरात शेकडो रुग्णांनी लाभ घेतला.

या शिबिरासाठी श्री संतोष पांचाळ कोंकण विकास आघाडी संपर्कप्रमुख सिंधुदुर्ग जिल्हा, सौ वैशालीताई राणे कोंकण विकास आघाडी महिला संपर्कप्रमुख सिंधुदुर्ग जिल्हा, श्री राजूदादा मालाडकर विक्रोळी विधानसभा अध्यक्ष, कोंकण विकास आघाडी, श्री सतीश मालंडकर मालवण कोंकण विकास आघाडी वॉर्ड अध्यक्ष 119 यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमास श्री अरूण जी सावंत साहेब, श्री अशोक राय, सौ. वीनाताई, सौ.दिपाताई, सौ.श्रावणी ताई, सौ. रजनीताई विक्रोळी विधानसभा अध्यक्ष महिला मोर्चा, सौ. गावडेताई, सौ. ममता परब, सौ.सुषमा, सौ. रुजूला, सौ. प्रियांका, श्री अमित सोनार, श्री राजेश भगत, सर्व पदाधिकारी, मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व पदाधिकारी, मान्यवर, फोर्टिस हॉस्पिटल चे सर्व डॉक्टर, नर्स, ज्येष्ठ नागरिक आणि ज्यांणी सहकार्य केले, त्या सर्वांचे आभार राणे मॅडम यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा