मसुरे :
मसुरे मार्गाचीतड येथील रहिवासी युवा पुरोहीत महेंद्र (पप्पू) विनायक गोरे वय वर्षे ४९ यांचे नुकतेच मुंबई कळवा येथे निधन झाले. मसुरे, ठाणा, मुंबई परिसरामध्ये युवा पुरोहित म्हणून ते प्रसिद्ध होते. मुंबईतील कोकणी माणसाचे ते आधारस्तंभ होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, भाऊ, दोन भावजय, तीन पुतणे, पुतणी असा मोठा परिवार आहे. मसुरे येथील ज्येष्ठ पुरोहित राजू गोरे यांचे ते भाऊ होतं.