You are currently viewing कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांचा कातवड येथे कार्यकर्त्यांशी संवाद

कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांचा कातवड येथे कार्यकर्त्यांशी संवाद

मालवण:

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीपथावर मार्गस्थ असताना मोठमोठ्या विकास प्रकल्पांसोबत सर्वसामान्य जनतेला विचारात घेऊन अनेक लोकाभिमुख योजनाही राबवल्या जात आहेत. लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विविध देशात आदरपूर्वक सन्मानित केले जात आहे. जागतिक स्तरावर भारताचे स्थान भक्कम होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी २०२४ च्या निवडणुकीत गुलाल आपलाच असला पाहिजे. सोबतच स्थानिक पातळीवरील सर्व निवडणुकांत १०० टक्के यश हेच लक्ष ठेवून आपल्या सर्वांचे योगदान महत्वाचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ९ वर्षातील कार्य अहवाल घराघरात पोहचवा. विजय आपलाच असेल. असा ठाम विश्वास मालवण कुडाळ भाजप विधानसभा प्रमुख माजी खासदार निलेश राणे यांनी कोळंब कातवड येथे बोलताना व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला यशस्वीरीत्या ९ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या निमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभरात मोदी@९ उपक्रम राबविला जात आहे. या अभियानांतर्गत रविवारी रात्री मसुरे जिप मतदारसंघातील कोळंब कातवड येथे माजी खासदार तथा कुडाळ-मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्ता संवाद ‘टिफिन बैठक’ संपन्न झाली.

बैठकीदरम्यान निलेश राणे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. तालुक्यात सुरू असलेल्या मोदी @९ अभियानाचा आढावा घेत मार्गदर्शन केले. गेला महिनाभर कुडाळ मालवण मतदारसंघात मोदी @९ अभियान अंतर्गत घर घर संपर्क अभियान राबविले जात आहे. त्याचाही आढावा निलेश राणे यांनी घेतला. पदाधिकारी कार्यकर्ते आपण सर्वजण चांगले काम करत आहात असे सांगत सर्वांचे कौतुक केले. सोबतच उपस्थित कार्यकर्त्यासोबत स्नेह भोजन केले.

बैठकीस भाजपा जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजन गावकर, विजय ढोलम, उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर, माजी बांधकाम सभापती अनिल न्हिवेकर, संतोष साटवीलकर, माजी आरोग्य सभापती आप्पा लुडबे, बबलू राऊत, विरेश पवार, दादा नाईक, अशोक चव्हाण, रवींद्र टेंबुलकर, विजय निकम, संतोष गावकर, दीपक सुर्वे, विक्रांत नाईक, ललित चव्हाण, अमित गावडे, शक्ती केंद्रप्रमुख मंगेश चव्हाण, बूथ अध्यक्ष विनायक धुरी, भिकाजी परब, ग्रामपंचायत सदस्य भाऊ फणसेकर, सुनील लाड, विजय सारंग, हनुमंत धुरी, गणेश आचरेकर, उमेश चव्हाण, रामदास ढोलम, निखिल करलकर, निलेश परब, सचिन नरे, अर्जुन चव्हाण, दीपक कोरगावकर, नागेश मोहिते, प्रकाश मोहिते, अमित लोके, दिगंबर लोके, सत्यवान लोके, चंद्रशेखर लोके, उत्तम चव्हाण, सुनील लाड, विजय सारंग, हनुमंत चौगुले, दाजी कनेरकर, चेतन वस्त यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी, बूथ अध्यक्ष, कार्यकर्ते उपस्थित होते. परिसरातील विकसकामांबाबत निवेदन ग्रामस्थ व पदाधिकारी यांच्या माध्यमातून निलेश राणे यांच्याकडे देण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा