*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य लेखिका कवयित्री मानसी म्हसकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*पाउस आला मोठा..!!*
काळ्या कभिन्न रात्री ,
वीज घाबरून कडाडली !
ढगांना आले भरून ,
आसवे शिवारात कोसळली !!
असा *पाऊस आला मोठा* ,
सगळंच गेलं वाहून !
चिऊताई कडे आला ,
कावळा हळूच दार उघडून !!
घरट्याचं झालेलं रीन्होवेशन ,
चिऊताई फ्लॅटमध्ये राहते !
स्मार्ट झाली खूपच ती ,
हातात आयफोन ठेवते !!
व्हाट्सअप फेसबुक वर एकांउट ,
पिल्लांसाठी केअर टेकर !
कावळ्यासाठी जेवण मागविले ,
झोमॅटो वर दिली ऑर्डर !!
काळाचा चक्र फिरता ,
सारंच चित्र बदललं !
इंटरनेटच्या जाळ्यामध्ये ,
अंतरीचं नातं अडकलं !!
कागदाची होडी हरवली ,
सगळीकडे डिजीटल बतावणी !
कावळा चिऊताईची आता ,
कोणी ऐकत नाही कहाणी !!
कावळा चिमणी आता ,
खूप च व्यस्त राहतात !
एकाच घरात राहून ,
अनोळखी सारखे वागतात !
…सौ मानसी म्हसकर बडोदा गुजरात