*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*प्रवास – सहवास*
हे धरणीमाता
तुझ्या प्रवासात
मी माझा प्रवास करतोय
तू स्वतः भोवती फिरतेय
अन् मी
तुझ्या सोबत
तुझ्या सहवासात
सानिध्यात फिरतोय
कुठवर नेईल प्रवास
सोबतीने
तुला अन् मला
हे काळच ठरवेल
तुझ्या सोबत घालवलेला
प्रत्येक क्षण
आनंदच देऊन गेला
दुःखातही संकटांवरही
मात करून गेला
असाच प्रवास तुझा
चिरकाल लाभो
अंतापर्यंत माझ्या
तुझाच सहवास लाभो
कवी :-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर , धुळे.*
7588318543.