अमरावती दि.१७(प्रति)-
या वर्षीच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सिविल सर्विसेस परीक्षे (IAS)मध्ये उत्तीर्ण झालेल्या महाराष्ट्रातील ८५ विद्यार्थ्यांचा सत्कार येत्या २८ जुलै रोजी दुपारी एक वाजता आयोजित करण्यात आलेला आहे .सुप्रसिद्ध सनदी अधिकारी तसेच मानव अधिकार आयोगाचे सदस्य त्याचप्रमाणे पुढचं पाऊल,करिअर कट्टा, चांगुलपणाची चळवळ या उपक्रमाचे प्रवर्तक व सुप्रसिद्ध लेखक डॉ.ज्ञानेश्वर मुळे यांनी पुढचं पाऊल या त्यांच्या सेवाभावी संस्थेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. गेल्या पाच वर्षापासून दरवर्षी नियमितपणे पुढचं पाऊल या संस्थेमार्फत महाराष्ट्रातील केंद्रीय लोकसेवा आयोगाची ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार घेण्यात येतो .या कार्यक्रमानिमित्त स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून अमरावतीच्या डॉ.पंजाबराव देशमुख अकादमीच्या मिशन आयएएस या उपक्रमांतर्गत डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्याशी चर्चा करून एक स्मरणिका काढण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या स्मरणिकेचे प्रकाशन दि.२८ जुलै रोजी दुपारी एक वाजता सत्कार समारोहात संपन्न होणार आहे. या स्मरणिकेमध्ये यावर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाची सिविल सर्विसेस पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती त्यापैकी काही निवडक मुलांचे अनुभव यांचा समावेश राहणार आहे. स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांनी आपले लेख आयएएस अधिकाऱ्यांचे अनुभव त्यांच्या भागातील आयएएस झालेल्या विद्यार्थ्यांची वर्तमानपत्रांमध्ये आलेली माहिती डॉ.पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीचे संचालक प्रा डॉ नरेशचंद्र काठोळे यांच्या 9890967003 या व्हाट्सअप नंबरवर पाठवावी असे आवाहन संस्थेच्या प्रसिद्धी पत्रकातून करण्यात आले आहे .
त्यांना स्मरणिकेच्या प्रति संस्थेच्या वतीने पाठविण्यात येतील. या उपक्रमामध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
============== प्रकाशनार्थ
प्रा डॉ नरेशचंद्र काठोळे
संचालक डॉ. पंजाबराव देशमुख अकादमी
अमरावती कॅम्प