You are currently viewing सावंतवाडी संस्थांनचे युवराज लखमराजे भोंसले यांची मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी निवड

सावंतवाडी संस्थांनचे युवराज लखमराजे भोंसले यांची मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी निवड

सावंतवाडी :

 

मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवर व्यवस्थापक प्रतिनिधींच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त व सावंतवाडी संस्थांनचे युवराज लखमराजे सावंत-भोंसले यांची खुल्या प्रवर्गातून निवड झालेली आहे. पुढील पाच वर्ष ते मुंबई विद्यापीठ अधिसभेवर काम करणार आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या वित्तीय अंदाज करिता व अर्थसंकल्पीय विनियोजना करिता हे महत्त्वाचे प्राधिकरण असल्याने विद्यापीठाच्या भविष्यातील विविध शैक्षणिक योजनाकरितांचे त्यांचे मत हे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. याचा निश्चितच फायदा मुंबई विद्यापीठाच्या अनेक शैक्षणिक योजनांकरिता होणार आहे पर्यायाने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ही फार मोठी उपलब्दी ठरली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर युवराज लखमराजे सावंत भोसले यांची निवड झाल्याने त्यांचे संस्थेचे सभासद, हितचिंतक आणि सर्वस्तरांमधून अभिनंदन होत आहे. सावंतवाडीत शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहचवण्यासाठी ज्यांनी महत्वाच कार्य केलं अशा पुण्यश्लोक बापुसाहेब महाराज, श्रीमंत शिवरामराजे भोंसले यांचा वारसा आणखीन जोमानं युवराज लखमराजे पुढे घेऊन जातील असा विश्वास शैक्षणिक क्षेत्रातील अभ्यासकांकडून व्यक्त केला गेला आहे. यात राजेसाहेब खेमसावंत भोंसले, राणीसाहेब शुभदादेवी भोंसले यांच मार्गदर्शन व उर्वशीराजे भोंसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांची साथ लाभत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा