खुशबू बचत गटाला सिंधुदुर्ग जि.प. सीईओ नायर यांनी दिली भेट
अध्यक्ष तन्वीर शिरगावकर यांच्याकडून घेतली खुशबू बचतगटाच्या यशोगथे ची माहिती
कणकवली
तालुक्यातील कलमठ गावातील राज्यात सर्वप्रथम आलेल्या खुशबू बचतगटाला जिल्हा परिषद सीईओ प्रजित नायर यांनी सदिच्छा भेट देत बचतगटाच्या प्रवर्तक तन्वीर मुद्स्सर शिरगावकर यांच्याकडून कामकाजाची माहिती जाणून घेतली. यावेळी कणकवली गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, उमेद चे अधिकारी, तसेच खुशबू बचतगटाच्या सदस्या उपस्थित होत्या.खुशबू बचतगटा च्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल अगदी यशस्वीपणे केली जात असून राज्यातील स्पर्धेत अलीकडेच खुशबू बचतगटाने प्रथम क्रमांक मिळवला होता. खुशबू बचतगटाच्या कामकाजाची माहिती घेण्यासाठी खुद्द सीईओ नायर यांनी कलमठ येथे भेट दिली. बचतगटाच्या माध्यमातून महिलांना रोजगार आणि शाश्वत आर्थिक सबलता कशी मिळाली याची यशोगाथा तन्वीर शिरगावकर यांच्याकडून जाणूस घेतली. तन्वीर शिरगावकर यांनी खुशबू बचतगटाच्या स्थापनेपासून आजवर च्या कामकाजाची इत्यंभूत माहिती दिली. बचतगटाच्या माध्यमातून महिलांनी एकत्र येत सुरू केलेल्या खुशबू मसाला उद्योगाची माहितीही नायर यांनी घेतली.यावेळी तन्वीर शिरगावकर यांनी खुशबू मसाले उद्योगाची विविध उत्पादने सीईओ नायर यांना दाखवत त्यांचे उत्पादन, पॅकेजिंग, ते मार्केटिंग ची प्रक्रिया कशी राबवली जाते याची माहिती दिली. खुशबू बचत गट हा अन्य बचतगटांसाठी रोल मॉडेल ठरेल. बचतगटाला काही अडचणी असल्यास निःसंशय संपर्क साधा, महिलांच्या उन्नतीसाठी आपण करत असलेले काम निश्चितच कौतकास्पद आणि अनुकरणीय असल्याचे सांगितले.