You are currently viewing सुकळवाड येथे भंडारी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार

सुकळवाड येथे भंडारी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार

मालवण:

 

कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघ व सुकळवाड गावराई भंडारी समाज संघ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री ब्राम्हणदेव मंदिर सभागृह सुकळवाड येथे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेतील भंडारी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार सोहळा संपन्न झाला.

तुम्ही सारे विद्यार्थी हे पुढील काळातील समाजाचे भविष्य आहात. त्यामुळे तुमची उत्तरोत्तर प्रगती होणे गरजेचे आहे. त्यासाठी भंडारी समाज सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे ठाम उभा राहिल. आजची समाजाच्या कौतुकाची थाप तुम्हाला खरी प्रेरणा देईल. कारण तुमचे प्रथम गुरू आई वडील दुसरे शिक्षक आणि तिसरा गुरू म्हणजे आपला समाज. त्यामुळे भविष्यात समाजाला कधीच विसरू नका. यापुढे पण असेच कौतुकास्पद यश मिळवताना समाजाचे नाव पण उज्वल करा असे आवाहन कट्टा पंचकोशी भंडारी समाजाचे अध्यक्ष मामा माडये यांनी बोलताना केले.

यावेळी व्यासपीठावर भंडारी समाज बांधव प्रदीप आवळेगावकर, संजय नाईक, ऍड. प्रदीप मिठबावकर, बाबुराव मसुरकर, लता खोत, मनमोहन डीचवलकर, अंकुश टेमकर, विवेक जबडे, किशोर वाक्कर, आनंद टेमकर, विद्याधर चिंदरकर, मामा बांदीवडेकर, गणेश वाईरकर, सतीश वाईरकर, प्रवीण मिठबावकर, संजय जावकर, प्रशांत टेबूलकर, संदीप सरमळकर, बादल चौधरी उपस्थित होते.

श्री ब्राह्मणदेव चरणी श्रीफळ वाढवून देवी सरस्वतीला हार अर्पण करून दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी सुकळवाड महिला वर्गाने स्वागतगीत सादर केले. उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी संजय नाईक, ॲड. प्रदीप मिठबावकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच आयुष मयेकर व ॲड.श्वेता तेंडुलकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर तळगाव गावचे सरपंच लता खोत व आंबेरी गावचे सरपंच श्री.मनोज डीचवलकर यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमादरम्यान अहिल्याबाई होळकर पुरस्कार मिळालेल्या महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. सुकळवाड गावराई भंडारी समाजाचे अध्यक्ष श्री.बाबुराव मसुरकर यांनी अध्यक्षीय भाषण दरम्यान मंडळाच्या सामाजिक कार्यक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. कीर्ती अजय मयेकर यांनी प्रास्ताविक अनघा मयेकर तर आभार स्वप्नील वेंगुर्लेकर यांनी मानले.

कार्यक्रमाला सुरेश कांबळी, बंडू माडये, सुनील पोखरणकर, अनिल पाटील, प्रकाश सरमळकर, मनोज वायंगणकर, प्रवीण जावकर, महेश पेडणेकर, सुभाष टेंबुलकर, गणपत हिंदळेकर, विलास मसुरकर, विजय हिंदळेकर, मोरेश्वर मसुरकर, विजय मयेकर, संतोष बिलये, अजय मयेकर, विलास पेडणेकर, बाबा करंगुटकर, संजय वायगणकर, प्रल्हाद वायगणकर, हरिश्चंद्र वायगणकर यासह कट्टा, सुकळवाड – गावराई समाज मंडळाचे समाज बांधव भंडारी समाजातील १० वी व १२ वी तील सर्व उत्तीर्ण विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा