You are currently viewing केसरकरांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी मतदारसंघात विविध लोकोपयोगी उपक्रम

केसरकरांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी मतदारसंघात विविध लोकोपयोगी उपक्रम

सावंतवाडी, वेंगुर्ले आणि दोडामार्गात “मेगा ऑर्थोपेडिक कॅम्प”

सावंतवाडी

राज्याचे शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या १८ जुलै रोजी होत असलेल्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात १७ ते २३ या कालावधीत विविध लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तर अधिवेशन कालावधी असल्यामुळे २३ जुलै रोजी मंत्री दीपक केसरकर हे वाढदिवसानिमित्त जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघांमध्ये दौरा करणार असल्याची माहिती, सावंतवाडी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी दिली.
दरम्यान, वाढदिवसादिवशी १८ जुलैला मंत्री केसरकर अधिवेशन असल्यामुळे मतदार संघात अनुपस्थित असले तरीही सा       वंतवाडीतील कार्यालयात कार्यकर्त्यांकडून केक कापून वाढदिवस साजरा केला जाणार आहे. यावेळी शुभेच्छा देण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त १७ जुलैपासून जिल्हाभरात विविध सेवा व शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात पणदूर अणाव येथील आश्रमांना मेडिकल कीट आदी इक्विपमेंट मित्रमंडळातर्फे दिली जाणार आहेत.त्याचबरोबर २३ जुलै रोजी दोडामार्ग येथे तालुकास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या निमित्ताने सामाजिक शैक्षणिक आरोग्य विषयक कृषिविषयक क्रीडा विषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सोमवारी १७ जुलै रोजी साहस प्रतिष्ठान तर्फे दिव्यांग विकास केंद्रांमध्ये भेट देऊन मुलांना खाऊचे वाटप केले जाणार आहे.
याशिवाय लोकमान्य ऑर्थोपेडिक हॉस्पिटल पुणे यांच्यावतीने मेगा ऑर्थोपेडिक कॅम्पसचे आयोजन करण्यात आले आहे. हा कॅम्प १८ ते २३ जुलै दरम्यान शिरोडा, वेंगुर्ले, दोडामार्ग, साटेली -भेडशी, बांदा आणि सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये आयोजित करण्यात आला आहे.
तर महिलांसाठी विशेष मार्गदर्शन कॅम्प सावंतवाडी येथील यशराज हॉस्पिटलमध्ये होणार आहे. त्याचबरोबर १८ जुलै रोजी शिवसेना जिल्हा युवती संघटना व जिल्हा महिला संघटनेच्या वतीने मुलींसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तर १९ जुलैला शालेय मुलांसाठी हस्ताक्षर वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. २१ जुलैला सावंतवाडी वेंगुर्ले आणि दोडामार तालुक्यातील सर्व शाळांमधील पहिल्या तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळांच्या मुख्याध्यापकांचाही सन्मान करण्यात येणार आहे.
तर रविवार २३ जुलैला ओटवणे श्री देव रवळनाथ मंदिरामध्ये भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याच दिवशी दोडामार्गात वर्षा मॅरेथॉन स्पर्धा २०२३ चे आयोजन तर वेंगुर्ले तालुक्यांमध्ये सर्व शाळांतील दहावी बारावीच्या पहिल्या तीन उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा एक शैक्षणिक साहित्य फळझाडे देऊन सन्मान करण्यात येणार आहे. त्याशिवाय फुटबॉल किंवा व्हॉलीबॉल स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राजन पोकळे यांनी दिली.
यावेळी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, माजी नगरसेविका भारती मोरे, दिपाली सावंत, शर्वरी धारगळकर, दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, सावंतवाडी तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, लतिका सिंग, पुजा नाईक, निलिमा चलवादी, गजानन नाटेकर परशुराम चलवाडी सायली होडावडेकर, जोस्ना मेस्त्री, भारती परब आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा