शून्यातून विश्व निर्माण करणारा दत्तप्रसाद पेडणेकर हा मसुरे गावचे खरे भूषण – आशिष खोत
मालवण / मसुरे :
महाराष्ट्र चेंबर कॉमर्स ऑफ अग्रिकल्चर च्या सभासद पदी मसुरे गावचे सुपुत्र, युवा पत्रकार आणि आर पी बागवे हायस्कूल चे माजी विद्यार्थी श्री दत्तप्रसाद पेडणेकर यांची कोकण विभागातून निवड झाल्याबद्दल आर पी बागवे हायस्कूल इयत्ता दहावी बॅच सन १९८८-८९ च्यावतीने मसूर येथे याच बॅच चे माजी विद्यार्थी आणि मसुरे देवस्थान प्रमुख तसेच देऊळवाडा विविध कार्यकारी संस्थेचे संचालक अजय प्रभू गावकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ देऊन आपल्या वर्ग मित्राला दत्तप्रसाद पेडणेकर याला गौरविण्यात आले.
आपल्या वर्ग मित्राची निवड एवढ्या मोठ्या पदावर ती झाल्यामुळे या सर्व बॅचमेंटचा आनंद गगनात मावेनासा झाल्यामुळे मसुरे येथे असलेल्या सर्व वर्ग मित्रांनी सत्काराचा हा अनोखा संबंध घडवून आणला.
यावेळी बोलताना या बॅचचे वर्ग मित्र, युवा कार्यकर्ते आशिष खोत म्हणालेत दत्ताप्रसाद पेडणेकर यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेले आहे. आज हा शून्य अनेक लोकांच्या मागे असून त्या सर्वांची किंमत खऱ्या अर्थाने वाढवण्याचं काम जोमाने करत आहे. पत्रकारिता समाजसेवा आणि गोरगरीब जनतेची सेवा ज्या पद्धतीने तो आज करत आहे हे आम्हा सर्वांसाठी अभिमानाचे आहे. दत्तप्रसाद आज खऱ्या अर्थाने मसुरे गावचे भूषण आहे.
जिल्हा नाभिक समाजाचे सचिव, मर्डे ग्राम पंचायत सदस्य तथा वर्गमित्र जगदीश चव्हाण म्हणाले आज आमच्या मित्राची निवड महाराष्ट्र चेंबर कॉमर्सच्या सभासद पदी झाली असून खरोखरच आम्हा सर्व विद्यार्थ्यांना, वर्गमित्रांना हे अभिमानाचे असून त्याच्या हातून या पदाला चांगला न्याय मिळावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या सत्कार समारंभाला खास मुंबईवरून उपस्थित राहिलेला शिक्षण क्षेत्रातील तज्ञ, बांदिवडे गावचा सुपुत्र सुनील मयेकर म्हणालेत आमच्या एस एस सी बॅच चा दत्तप्रसाद हा कोहिनूर असून खरोखरच महाराष्ट्र चेंबर ने सुद्धा योग्य व्यक्तीची निवड या पदासाठी केली आहे. अष्टपैलू व्यक्तिमत्व कसं असावं हे दत्तप्रसाद कडे पाहिलं की आम्हा सर्वांना ते समजत. दत्तप्रसाद आमच्या बॅचचा मार्गदर्शक सुद्धा आहे हे सुद्धा खूप मोलाचे आहे. यावेळी आर पी बागवे हायस्कूल १९८८-८९ च्या बॅचचे अजय प्रभू गावकर, दिनकर दुखंडे, रमेश पाताडे सुनील मयेकर आशिष खोत जगदीश चव्हाण, महेश खोत,आनंद पाटील,राजू वेरलकर, संतोष परब, प्रमोद बागवे, निधी पेडणेकर, मानसी पेडणेकर,मसुरे माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर,मेघश्याम पेडणेकर,ज्योती पेडणेकर आणि वर्गमित्र उपस्थित होते. यावेळी सत्कारास उत्तर देताना दत्तप्रसाद पेडणेकर म्हणालेत मी खरोखरच भाग्यवान आहे की मला आज माझ्यावरती मनापासून प्रेम करणारे माझे सर्व क्लासमेट मिळालेत आज मला मिळालेले हे पद माझे नसून माझ्या सर्व वर्ग मित्रांची पुण्याई असल्यामुळेच हे पद मला मिळाले आहे. हे पद माझा मान सन्मान हा माझा नसून या माझ्या संपूर्ण बॅच चा आहे. या पदाला योग्य न्याय देण्याचे काम मी मनापासून करीन आणि माझ्या या १९८८-८९ दहावीच्या बॅचचे नाव देशपातळी नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन. यावेळी मुंबईहून याच बॅचची विद्यार्थिनी भारती सावंत धुरी हीने दूरध्वनीवरून दत्तप्रसाद याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार आदर्श शिक्षक वर्गमित्र रमेश पाताडे यांनी मानले. सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन दिनकर दूखंडे यांनी केले. आर पी बागवे हायस्कूल मसुरे इयत्ता दहावी सन १९८८-८९ ही बॅच गरीब विद्यार्थी दत्तक घेणे, तसेच विविध समाजाभिमुख कार्य करणे, गोरगरीब जनतेला, रुग्णांना वेळोवेळी मदत करणे, शालेय महत्त्वाच्या गरजा पूर्ण करणे अशा पद्धतीचे उपक्रम मसुरे गावात आगळ्यावेगळ्या पद्धतीने करत असते.