*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री पल्लवी कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*
*” बाईपण भारी देवा “…..*
सध्या सोशल मिडियावर ” बाई पण भारी देवा ” हा सिनेमा प्रचंड फेमस झालेला दिसतोय आपल्याला. काही उलट काही सुलट मतप्रवाह वाहताना दिसत आहेत..प्रत्येकाचा आपला दृष्टिकोन असतो यात वाद नाही…यात कुणाचे बरोबर कुणाचे चूक हा विषयच होऊ शकत नाही.पण हा सिनेमा सिनेमागृहात नक्कीच गर्दी खेचण्यात यशस्वी झालाय यात वाद नाही. बायकांना प्रचंड आवडला आहे हा..पण काही पुरुष मते ही फेवर दिसत आहेत..
“बाई पण भारी” खरचं भारी भाव खाऊन जात आहे,असेच चित्र दिसतेय.
मी ही नुकताच ‘बाईपण भारी’ हा सिनेमा बघितला.खूप छान सिनेमा आहे.यात स्टारकास्ट जबरदस्त असल्याने आणि त्या सर्वांनी कामे उत्कृष्ठ केल्याने सिनेमा अर्थातच यशस्वी झाला आहे. केदार शिंदे यांचे कौतुक येवढ्यासाठी की एवढ्या बायका, त्यात ही त्या एकापेक्षा एक यशवंत…त्यांना एकत्र घेऊन सिनेमा काढणे,त्यांची मर्जी सांभाळून काम करवून घेणे सोपे नसणार…
या सिनेमातून जाता जाता अनेक संदेश मिळत जातात..हे ही यशाचे एक कारण आहे.उदा…मुलीच्या संसारात किती हस्तक्षेप करावा….ज्यामुळे मुलगी ही त्रासते…एका मर्यादे पुढे फार डोकावु नये कुणाच्या आयुष्यात…तर सुनेची आवड बघून तिला प्रोत्साहन देणे,तिला मुलगी मानणे… स्वतः ची ताकद ओळखुन वेळ प्रसंगी एकटे राहून स्वतः च्या पायावर आपण उभे राहू शकतो हा आत्मविश्वास , आपापसातील नात्यातील शुल्लक कारणामुळे येणारा दुरावा हा किती वर्षे टिकू शकतो….त्यामुळे हे टाळायला हवे..शुल्लक गोष्टींनी नात्यात दुरावा येऊ देऊ नये ..….
अशा अनेक गोष्टी या सिनेमातून मिळतात आणि विशेष म्हणजे यात कुठेही पुरुषांची बरोबरी करणे किंवा त्यांना कमी लेखणे हा उद्देश नाही…
यात पुरुष कलाकार पण तगडे घेतले आहेत ..काम कमी असले, तरी त्यांनी ही उत्कृष्ठ निभावले आहे .शरद पोंक्षे यांनी छोटी भूमिका उत्तम निभावली आहे…
प्रत्येक पुरुषांनी ही बघायला हरकत नाही हा सिनेमा.
या सिनेमा बद्दल उलट सुलट खूप प्रतिक्रिया ही वाचल्या . त्यातील चुका काढून ‘हा सिनेमा कसा काय कुणाला आवडू शकतो’….असा ही एक मत प्रवाह वाचण्यात आला….
त्यांना मला एकच सांगायचे आहे ..ते म्हणजे……..
सिनेमा चांगला आहे..त्याचा एवढा किस काढू नका. मनोरंजन म्हणून बघा..आणि हो सर्व महिला वर्ग त्यानिमित्ताने एकत्र येऊन सिनेमा बघत आहेत,फोटो,सेल्फी काढून घटकाभर सिनेमा हॉल मध्ये नाचत दंगा करत आहे..हे खरचं खूप छान आहे…महिला आनंद घेत आहेत…
त्यात स्टोरी चांगली नाही, हे पटले नाही… ते पटले नाही ..म्हणून कशाला वाद घालायचा?……
या सिनेमाला चक्क सिनियर सिटिझन पण येत आहेत थेटर मध्ये…माझ्या वेळेस तर 80 च्या आसपासच्या 3/4जणी होत्या…काठ्या टेकत आल्या होत्या…आम्ही ही सिनियर सिटिझन आहोत ..आमचा ही गृप घेऊन गेलो…जुने दिवस आठवले..टाळ्या वाजवून आम्ही ही दाद देऊन निर्मळ आनंद घेऊन घरी आलो..त्या निमित्ताने एकत्र आलो , खाणे.. पिणे केले,…मजा आली .. गप्पा ही झाल्या…फ्रेश होऊन परतलो…..
हा आनंद नक्कीच या सिनेमाने घरोघरी दिला आहे..
आम्ही चुका काढत नाही बसलो….
तरी आनंद घ्या..आनंद द्या…एवढंच🙏
जरूर आपल्या मैत्रिणींना घेऊन थिएटर मध्ये सिनेमा बघून या .सोबत दंगा मस्ती करून एन्जॉय करा… एखादा दिवस आपला म्हणून साजरा करा….
……………………………………..
पल्लवी उमेश ..
जयसिंगपूर..