निविदा प्रक्रिया लवकरच सुरू – नगराध्यक्ष समीर नलावडे
कणकवली
कणकवली नगरपंचायत क्षेत्रातील भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून त्यांना पुन्हा त्याच परिसरात सोडण्यात येणार आहे. त्याबाबतची निविदा प्रक्रिया लवकरच करण्यात येईल, अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आज दिली.
कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत श्री.नलावडे बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, आरोग्य सभापती अभिजित मुसळे, नगरसेवक विराज भोसले, मेघा गांगण, अण्णा कोदे, प्रणाम कोदे, अजय गांगण, किशोर राणे व नगरपंचायत कर्मचारी किशोर धुमाळे, सतीश कांबळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
श्री.नलावडे म्हणाले, कणकवली शहरात भटक्या कुत्राच्या उपद्रव वाढला आहे. त्याअनुषंगाने तातडीने उपाययोजना करणार आहोत. ५ दिवसांत टेंडर काढलं जाईल. शासनाचे नियम पाळून ही प्रक्रिया होईल. त्यानुसार आम्ही काही संस्थाशी आम्ही संपर्क साधला आहे. दोन सोसायटी फॉर अँनिमल प्रोटेक्शन नागपूर व अँनिमल फ्रेंड वेलफेअर पब्लिक सोसायटी ठाणे या दोन संस्था आहेत.
ते म्हणाले, भटक्या कुत्र्यांना पकडून आणि त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून सोडले जाणार आहे. तसेच शस्त्रक्रिया झालेल्या कुत्र्यांना टॅग लावले जाणार आहेत. यासाठी शासनाचा दर असेल त्याप्रमाणे निविदा होईल. कमी दर असेल त्यांना निविदा दिली जाईल. नगरपंचायतच्यावतीने पाणी, जागा, शस्त्रक्रिया, लाईट व्यवस्था करण्यात येईल. या उपक्रमाचा परिणाम किमान दोन वर्षात दिसेल. शहरात भटक्या कुत्र्याची संख्या ५०० पेक्षा जास्त आहेत. त्याचा सर्वे केला जाईल. त्यानंतर कुत्रे पकड मोहीम राबविण्यात येणार आहे. सर्व प्रक्रिया लवकरच केली जाईल.
श्री. नलावडे म्हणाले, रेबीज असलेल्या भटक्या कुत्र्यांना मारण्यात येईल. त्यासाठी आमची तयारी आहे. सर्व जबाबदारी आम्ही घेऊ, आ.नितेश राणे हे शस्त्रक्रिया युनिट साठी आपली जानवली येथील जागा देण्यात आहेत. दरम्यान शहरात मोकाट जनावरे शहरात मोठ्या प्रमाणात आहेत. नरडवे रोडवर थांबतात, चरण्यासाठी ही गुरे जातात. ती गुरे आमच्या ग्रामीण भागातील आहेत, असे शेतकरी सांगतात. त्यामुळे कणकवलीत नरडवे रोडवर काही गुरांचा मार्ग आहे, त्याबाबत आम्ही दक्ष आहोत असे समीर नलावडे यांनी सांगितले.