You are currently viewing सर्जेकोट येथील शीतल जामसंडेकर यांना शासनाकडून ९५ हजार १०० रु ची मदत…

सर्जेकोट येथील शीतल जामसंडेकर यांना शासनाकडून ९५ हजार १०० रु ची मदत…

वडाचे झाड कोसळून घराचे झाले होते नुकसान

आ. वैभव नाईक, नायब तहसीलदार आनंद मालवणकर यांच्या उपस्थितीत धनादेश सुपूर्त

वडाचे झाड घरावर कोसळून नुकसान झालेल्या मालवण सर्जेकोट येथील शीतल सीताराम जामसंडेकर यांना शासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाईपोटी ९५ हजार १०० रु ची मदत देण्यात आली आहे. याबाबत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व शासनदरबारी पाठपुरावा केला होता. आज आ. वैभव नाईक, नायब तहसीलदार आनंद मालवणकर यांच्या उपस्थितीत जामसंडेकर कुटुंबियांना शासनाच्या माध्यमातून धनादेश देण्यात आला.

मालवण सर्जेकोट येथे बंदरजेटीनजीक शीतल सीताराम जामसंडेकर यांच्या घरावर जून महिन्यात जुनाट वडाचे झाड कोसळले होते. यामुळे जामसंडेकर यांच्या घराचे मोठे नुकसान झाले होते. प्रशासनाकडून पंचनामा करण्यात आला. आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या घराची पाहणी करून शासनाच्या माध्यमातून मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली होती. याबाबत आ. वैभव नाईक यांनी पाठपुरावा केला होता. त्यानुसार शासनाच्या माध्यमातून जामसंडेकर कुटुंबियांना नुकसान भरपाईपोटी ९५ हजार १०० रु ची मदत देण्यात आली आहे. याबाबत जामसंडेकर कुटुंबियांनी शासनाचे व आ. वैभव नाईक यांचे आभार मानले आहेत.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर , नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरसेवक मंदार केणी, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहर प्रमुख बाबी जोगी,छोटू ठाकूर, भारती आडकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा