*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*
*बाईपण*
ओठावर हंसू पदरात निखारे
निखारे विझायला नको आणि पदरही पेटायला नको
हे असतं बाईपण!
माझे मामा एकदा बोलता बोलता म्हणाले,” जन्माने मी पुरुष झालो. मुलांना जन्म देऊन मी माझं पौरुष सिद्ध केले. शरीराने मी ताकदवान, बलवान आहेच पण एक सांगू का जेव्हा संसारात एका मागोमाग एक संकटे येत गेली ना तेव्हा मी बाई झालो आणि तुझी मामी मात्र पुरुष झाली. तिच्या बाईपणात एक कणखर पुरुष मी नेहमीच पाहिला आहे. बाईपण म्हणजे असते नाजूकपणाची आणि कणखरपणाची अशी बेमालून सरमिसळ.
परंपरेने स्त्री आणि पुरुषांचे काही आराखडे तयार केले. त्यात पराक्रम, सामर्थ्य, धैर्य, बुद्धिमत्ता, ही पुरुषांची वैशिष्ट्ये आणि भावनिकता, परावलंबित्व, भित्रेपणा, चंचलता, अधीरता, लाजाळूपणा म्हणजे स्त्रीत्व. वास्तविक अत्यंत बोथट असे हे आराखडे.
स्त्रीत्वाबद्दलच्या समजूतीत संपूर्ण परिवर्तन झाले आहे हे केवळ एक कपोल कल्पित सत्य म्हणावे लागेल. पण स्त्रीवाद, स्त्री-पुरुष समानता, स्त्री असल्यामुळे तिचे समाजातले दुय्यम स्थान, तिच्यावर होणारे अन्याय, अत्याचार, एकंदरच पुरुषप्रधान समाज संस्कृतीच्या केंद्रस्थानी असलेल्या एका घायाळ स्त्रीच्या प्रतिमेपलिकडची तिची प्रतिमा पाहूयात.
त्यावेळेस सहज मनात येते,स्त्री आणि बाईपण या दोन वेगळ्या बाबी आहेत. बाईपण ही एक संकल्पना आहे. आणि बाईपण म्हणजे काय हे अनाकलनीय आहे. यातूनही एक प्रश्न मनात येतो की यासाठी बाईच असायला हवं का? संभ्रमात पडलात ना तुम्ही?
सांगते.
माझ्या एका जिवलग मैत्रिणीचे वडील वारले तेव्हा मी तिला भेटायला गेले होते. त्यावेळी ती मला म्हणाली, “आज खऱ्या अर्थाने मी पोरकी झाले. आईला तर मी पाहिलेही नव्हते. बाबाच आम्हा भावंडांचे आई झाले. त्यांनी आमच्या जीवनात आईचं उणेपण कधीही जाणवू दिलं नाही आणि आम्ही आमच्या आईला बाबांमध्येच पाहिलं. आज असं वाटतंय की आमची आईच गेली.”
असंही पुरुषातलं हे बाईपण.
बाईपण या शब्दाभोवती एक प्रचंड पॉवर आहे. बाईपण म्हणजे काहीतरी हीन, पालापाचोळा, दुर्लक्षित, फुंकर मारण्या इतकं हलकं कधीच नसतं. ते नेहमीच भारी असतं. यमाला माघार घ्यायला लावणाऱ्या सावित्रीत ते असतं. शूंभ—निशुंभाला रगडणाऱ्या दुर्गेत ते असतं. स्वराज्याच्या रक्षणाकरता धडे देणाऱ्या जिजाऊ, अहिल्यात ते असतं. अनाथांची माऊली बनणाऱ्या सिंधुताईत ते असतं. मदर तेरेसात असतं, फ्लॉरेन्स नाईटींगेल मध्ये असतं.
बाईपण म्हणजे प्रकाश.
बाईपण म्हणजे धैर्य.
बाईपण म्हणजे वाकणं पण मोडणं नाही.
एक तळपणारी मूर्तीमंत तलवार म्हणजे बाईपण.
खरोखर बाई पण भारी देवा ..
राधिका भांडारकर पुणे.
*संवाद मिडिया*
*नोकरी👨🏻💻, व्यवसाय👨🏻💼 करता-करता शिक्षण घ्या📚, आणि पदवी मिळवा…👨🏻🎓*
_🤩होय…!! आता पदवीचे👨🏻🎓 शिक्षण *✡️यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, सावंतवाडी✡️* यांच्या माध्यमातून झाले आहे सोपे…🤗_
*🔖प्रवेश सुरू..!! सन २०२३-२४ वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू…📑*
_प्रत्यक्ष या…🏃🏻♀️ आणि आजमावून पहा *✡️यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, सावंतवाडी✡️* मुख्य प्रवेश केंद्राचे वेगळंपण…!!🤗_
https://sanwadmedia.com/99691/
*🛑यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मार्फत उपलब्ध शिक्षणक्रम*
◾बी. ए. / बी. कॉम
◾एम. कॉम
◾एम. ए. (मराठी)
◾एम. ए. (हिंदी)
◾एम. ए. (इंग्लिश)
◾एम. ए. (अर्थशास्त्र)
◾एम. ए. (लोक प्रशासन)
◾एम.बी.ए. (HR, Fin, Mkt, Mnfg)
◾रूग्ण सहायक(पेशंट असिस्टंट)
*🔸टेक्निकल व इतर विद्यापीठ कोर्सेस विषयक मार्गदर्शन उपलब्ध*
*📌१० वी किंवा १२ वी उत्तीर्ण, पदवीधर, व्यावसायिक, नोकरदार व महिलांसाठी शिक्षणासाठी संधी…🤩*
*♦️स्पर्धा परीक्षा (उदा. एमपीएससी, युपीएससी) साठी उपयुक्त व सक्षम शिक्षण*
*♦️कोर्स फी मध्येच अध्ययन साहित्य उपलब्ध*
*🔖त्वरित नावनोंदणी करा..!📑*
*♦️आरपीडी ज्युनि. कॉलेज स्थित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ प्रवेशासाठी आजच संपर्क करा…📲*
*🎴आमचा पत्ता:-*
*♦️मुख्य प्रवेश कार्यालय👇*
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, डॉ. जे. बी. नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, आर. पी. डी. ज्युनि. कॉलेज गेट नं. २समोर, आनंदी कॉम्प्युटर शेजारी, सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी
*📲संपर्क:-*
*🔸तुषार वेंगुर्लेकर*
8605992334 / 9422896699
*🔹राहुल भालेराव*
8856993826
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/99691/
—————————————————