*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा. सदस्य लेखक कवी श्री अरुण देशपांडे लिखित रचना*
*श्रीगोंदवलेकरमहाराज काव्यचरितावली काव्यपुष्प-३५ वे*
—————————————-
गोंदवलेस श्रीमहाराज राहिले
परी कुणा त्यांनी ओळखू ना दिले
सोडून गाव आपले गोंदवले
ते आता खातवळ गावास आले ।। १ ।।
खातवळ त्यांची सासुरवाडी गाव
मुक्काम मारुती मंदिरात केला
आला हो ज्ञानी महंत ,बातमी ने
गाव सारा दर्शना येऊ लागला ।। २ ।।
श्रीमहाराजांच्या चरणी जन सारे
गाऱ्हाणी, अडचणी त्या मांडीती
योग करा, घ्या औषधी नेमाने
नामस्मरण उपाय त्यांना सांगती ।। ३ ।।
श्रीमहाराज एकटे असतांना
त्यांच्या सासूबाई कन्येसह आल्या
म्हणे- घरधनी हिचा नाहीसा झाला
येईल कधी परत ? सांगा आम्हाला ।। ४ ।।
श्रीमहाराज,दोघीना बोले हसुनी
येईल घरधनी हो लवकरी
नामस्मरण अखंड हिने करावे
मनोभावे श्रीरामास विनवावे ।। ५ ।।
श्रीमहाराजांनी जैसे सांगितले
तैसे आचरण तिने आरंभिले
मानसपूजा, दासबोध वाचन
आपल्या मनास तिने गुंतविले ।। ६ ।।
म्हणे-अरुणदास- सांगेन या पुढचे
————————————–
श्रीगोंदवलेकरमहाराज काव्यचरितावली काव्यपुष्प-३५ वे
कवी- अरुणदास”-अरुण वि.देशपांडे-पुणे
9850177342
—————————————-