भास्कर जाधवने त्वरित महाराष्ट्र पोलिसांची माफी मागावी – निलेश राणे
मुंबई
शिवसेना आमदार भास्कर जाधव यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. त्याच्या मध्ये कार्यकर्त्यांला सांगतात की, तू दारू अनधिकृत विक पोलीसवाले काय हप्ता घेत नाहीत काय.. ही भाषा एका लोकप्रतिनिधीची आहे. मला लाज वाटते की हा कोकणातला आमदार आहे. स्वतःच्या मतदारसंघात वाटोळं केलं. बेरोजगारी तसेच त्यांच्या मतदारसंघात रस्तेदेखील खराब आहेत. ह्या आमदारांने एकही समाजोपयोगी कार्यक्रम केला नाही. तसेच एक कारखाना व बालवाडी देखील उभा करू शकले नाही. नशिबाने सगळी मोठी पद यांना मिळाली.
“बोलीचा भात आणि बोलाची कडी” यापलीकडे जाऊन आमदार भास्कर जाधव यांनी मतदारसंघाला आणि कोकणाला काहीच दिलं नाही. आता सध्या कोकणात भास्कर जाधवला काडीची सुध्दा इजत नाही. कारण आमदाराला दुसऱ्यावर टीका करण्यापलीकडे काहीच जमलेलं नाही. अशी जोरदार टीका भाजपचे नेते माजी खासदार निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांच्यावर केली आहे.
श्री. राणे पुढे म्हणाले की, भास्कर जाधवचा वयक्तिक भाग असला तरी त्यांनी महाराष्ट्र पोलिसांचा अपमान केला आहे. पोलिसांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. आज जो आरोप केला आहे महाराष्ट्र पोलिसांवर असा काय पुरावा होता भास्कर जाधव कडे ? की कुठे हफ्ते मागितले किंवा कस काही केलं? हे आता आमदारांनी महाराष्ट्र पोलिसांबद्दलचा आरोप हा सिद्ध करावा लागेल नाही तर पोलिसांची माफी मागावी लागेल. माफी तर मागावीच लागेल. कारण की याच्यामध्ये भास्कर जाधव ने पोलिसांचा अपमान केलेला आहे यामध्ये दुमतच नाही. पण भास्कर जाधव ने माफी मागून त्वरित पुरावा द्यावा ही आमची मागणी आहे.
भास्कर जाधव स्वतःच घर कस चालवतो हे आम्हाला सांगायची परत गरज पडता कामा नये. महाराष्ट्र पोलीसांचा अपमान करायचा नाही. नाही तर तुमचे धंदे काय आहे? किती वाळूवाले तुमचे घर चालवतात? वाळू माफियांचे तुमचे काय संबंध आहे ? हे पुरावे सहित आम्ही सगळे बाहेर काढू. असे श्री राणे यांनी सांगितले.