You are currently viewing सुप्रसिद्ध गझलकार,कवी मधुसुदन नानिवडेकर यांच्या व्दितीय स्मृती दिनाचे औचित्य साधून “मधुस्मृती” या आदरांजली पर कार्यक्रमाचे ११ जुलै रोजी तळेरे येथे आयोजन

सुप्रसिद्ध गझलकार,कवी मधुसुदन नानिवडेकर यांच्या व्दितीय स्मृती दिनाचे औचित्य साधून “मधुस्मृती” या आदरांजली पर कार्यक्रमाचे ११ जुलै रोजी तळेरे येथे आयोजन

तळेरे : प्रतिनिधी

तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघ,संवाद परिवार तळेरे आणि प्रज्ञांगण तळेरे यांच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध गझलकार, जेष्ठ कवी मधुसुदन नानिवडेकर यांच्या व्दितीय स्मृती दिनाचे औचित्य साधून “मधुस्मृती” या आदरांजली पर कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार दि.११ जुलै रोजी दुपारी ठीक ३.०० वाजता करण्यात आले आहे.सदरचा कार्यक्रम वामनराव महाडिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या डॉ.एम्.डी.देसाई सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ.मिलिंद कुलकर्णी , तळेरे सरपंच- हनुमंत तळेकर,कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष- अजित सावंत, वामनराव महाडिक विद्यालय तळेरेचे प्राचार्य-अविनाश मांजरेकर,राजापूर अर्बन बॅंकेच्या तळेरे शाखेचे शाखाधिकारी- दुर्गेश बिर्जे, सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तरी सदरच्या कार्यक्रमप्रसंगी सर्व नानिवडेकर प्रेमी,हितचिंतक,ग्रामस्थ तसेच पत्रकार संघाच्या सर्व सभासदांनी वेळीच उपस्थित रहावे असे आवाहन तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाचे अध्यक्ष डी.जे.मारकड व उपाध्यक्ष उदय दुधवडकर यांनी केले आहे.
फोटो:
मधुसूदन नानिवडेकर

प्रतिक्रिया व्यक्त करा