अनंत पिळणकर जिल्हा उपाध्यक्ष
अनेक पक्षाची चव आणि एका रात्रीत तीन पक्ष बदलणाऱ्या काका कुडाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेवर बोलण्यापेक्षा आपल्या आतापर्यंत च्या राजकीय कारकीर्दीचा लेखाजोखा घ्यावा नंतरच कोण निष्क्रिय हे बोलावे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घटना आणि कार्यप्रणाली माहीत नाही त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही, आपल्या पक्ष प्रवेशावर भरोसा नव्हता आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची इच्छा नसताना जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या शब्दाखातर आपल्यावर प्रदेश संघटक सचिव पदाची जबाबदारी दिली,त्या पदाला आपण किती न्याय दिला ? जिल्हाध्यक्ष यांनी जिल्हा परिषद मतदारसंघ निहाय दौऱ्याची जबाबदारी दिली,ती पार पाडली का,कारण आपण अनेक पक्ष फिरून राष्ट्रवादी मध्ये आलात पण राष्ट्रवादी मध्ये एकसंघ झाला नाही,आपले दोन दगडांवर पाय होते,की एका दगडावर यांचे आत्मपरीक्षण काका कुडाळकर यांनी करावे,काका कुडाळकर पक्षात आले कधी? कशासाठी ?आणि काय? साध्य करण्यासाठी,पण जो उद्देश बाळगून काका कुडाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला तो उद्देश साध्य झाला नाही म्हणून जिल्हाध्यक्ष निष्क्रिय? नाही, आपण जे उद्दीष्ट ठरवून पक्षात प्रवेश केला तो उद्देश साध्य होत नाही हे लक्षात आल्यावर महाविकास आघाडीची सत्ता असताना महाविकास आघाडीच्या कोणकोणत्या मंत्र्यांच्या गाठीभेटी घेणे सुरू होते ? कशासाठी?तसेच महाविकास आघाडीची सत्ता गेल्यापासून वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या किती पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना फोनाफोनी करून काय काय उपद्व्याप केले,त्याची इत्यंभूत जंत्री आमच्या कडे आहे,
त्या काका कुडाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच आहोत म्हणून वक्तव्य करताना आपण राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आला कधी ? याच बरोबर तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा इतिहास आणि घटना यांची माहिती नाही,गेले वर्षभर काका कुडाळकर आपण अस्वस्थ होता,पण इकडे आड तिकडे विहीर अशा परिस्थितीत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्याची संधी साधून जिल्हाध्यक्ष पदाच्या अपेक्षेने अजित पवार गटात सामील झाला,आणि अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष पदी अबिद नाईक यांच्या नियुक्तीची घोषणा झाल्यानंतर आपण त्याच दिवशी शिंदे गटात जाण्याचा सुद्धा विचार केला होता,तोही प्रयत्न फसला म्हणून नाईलाजाने मुळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन तीन कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही राष्ट्रवादीतच असा कांगावा करून आयत्या बिळात नागोबा ही परिस्थिती निर्माण करून मुळ पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमोर पुंगी वाजवत त्यांचा नागोबा केलात ते पुंगीच्या तालावर डुलत आहेत, ज्यावेळी पुंगी वाजायची बंद होईल त्यावेळी हे प्रत्येकजण आप आपले बीळ शोधत सुटतील,तसेच जे दोन तीन मुळ राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सोबत घेऊन पत्रकार परिषद घेतली ते अभिनंदन मालणकर व प्रफुल्ल सुद्रीक हे मोठ्या जबाबदार पदावर होते त्यांनी त्या पदाला न्याय किती दिला,याचेही आत्मचिंतन काका कुडाळकर अभिनंदन मालणकर प्रफुल्ल सुद्रीक यांनी करावे,असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव पिळणकर यांनी केला आहे,