बांदा
जिल्हा परिषद बांदा नं.१ केंद्रशाळेतील विद्यार्थिनीं कुमारी पूर्वा हेमंत मोर्ये व दिव्या मारुती तरटे दोन विद्यार्थीनींची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली असून शाळेचे विद्यार्थी नवोदयला विद्यालयाला निवड होण्याची परंपरा कायम राहिली आहे.
चालू वर्षी २९ एप्रिलला जवाहर नवोदय विद्यालयासाठी इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांची निवड करणेसाठी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. मनुष्यबळ विकास मंत्रालयामार्फत राबविल्या जात असलेल्या या विद्यालयात सहावीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना बारावी पर्यंतचे शिक्षण मोफत मिळते,. बांदा केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांची दरवर्षी नवोदय विद्यालयात निवड होत असते याही वर्षी नवोदयला विद्यार्थ्यांची निवड झाल्याबद्दल शाळेने यशाची परंपरा कायम राखली आहे.या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक प्रशांत पवार व सरोज नाईक यांचे मार्गदर्शन मिळाले.या यशस्वी विद्यार्थ्यांचे गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, विस्तार अधिकारी दुर्वा साळगांवकर, केंद्रप्रमुख संदीप गवस, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर ,बांदा सरपंच प्रियंका नाईक. मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर,पदवीधर शिक्षिका उर्मिला मोर्ये,रसिका मालवणकर ,स्नेहा घाडी,जे.डी.पाटील, रंगनाथ परब, शांताराम असनकर, शुभेच्छा सावंत, जागृती धुरी, शितल गवस ,गोपाळ सबळे, मनिषा मोरे,सपना गायकवाड यांनी अभिनंदन केले . विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.