*गावडे आंबेरे येथील मच्छिमारांना सागरी सुरक्षेचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न*
रत्नागिरी- मच्छिमारी हा व्यवसाय खूप जोखमीचा आहे. वर्षानुवर्षे मासेमार करताना मासेमारांना समुद्रामध्ये विविध आपत्तीना तोंड द्यावे लागते . हृदय विकाराचा झटका येणे, बोटीवरून पाण्यात पडून बुडणे इत्यादी आपत्तीमध्ये आपत्तीचे व्यवस्थापन कसे करावे या बद्दलची शास्त्रीय माहिती मासेमारांना असणे गरजेचे आहे. जेणेकरून आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळता येते अथवा कमी करता येते. या अनुषंगाने मच्छिमारांना सागरी सुरक्षेचे या विषयाचे महत्व ओळखून गावडे आंबेरे येतील मासेमारांना रिलायन्स फाउंडेशन , सर्वोदय मच्छिमार सेवा सहकारी संस्था , समर्थ साई मच्छिमार सेवा सहकारी संस्था , शिवसागर मच्छिमार सेवा सहकारी संस्था , सागरी मच्छिमार संघटना व नागरी संरक्षण केंद्र रत्नागिरी व मत्स्य व्यवसाय विभाग रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सागरी सुरक्षेचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यक्रम गावडे आंबेरे येते आयोजित करण्यात आला होता
या कार्यक्रमप्रसंगी रिलायन्स फाउंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक , श्री राजेश कांबळे, कार्यक्रम सहायिका श्रीमती प्रणाली गोरे , नागरी संरक्षण केंद्र रत्नागिरीचे सहाय्यक उपनियंत्रक श्री. ए. एन . गधरी, मत्स्य व्यवसाय विभागाचे परवाना अधिकारी श्री चिन्मय जोशी उपस्थित होते. या कार्यक्रमप्रसंगी रत्नागिरीच्या नागरी संरक्षण दलाचे सहाय्यक उपनियंत्रक श्री. ए. एन . गधरी यांनी समुद्रामध्ये मच्छिमारांना हृदय विकाराचा झटका आल्यास व पाण्यात बुडाल्यास, मासेमारांना हाताळायच्या विविध शास्त्रीय पद्धती प्रात्यक्षिकासहित समजावून सांगितल्या तसेच कृत्रिम श्वासोश्वास, CPR म्हणजे हृदय विकाराचा झटका आलेल्या रुग्णाला कृत्रिम श्वासोश्वासवासाद्वारे दिलासा कसा द्यावा याचे प्रात्यक्षिक करून दाखविले तसेच मच्छिमारांना प्राथमिक उपचार कसे द्यावेत या बद्दल माहिती देण्यात आली .
त्याचप्रमाणे श्री चिन्मय जोशी यांनी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, गट अपघात विमा, सिंधुरत्न योजना इत्यादीबद्दल सविस्तर माहिती दिली . सर्व क्रियाशील मासेमाराणा गट अपघात विम्याचे महत्व सांघून, या विम्यासाठि लागणारी माहिती मत्स्य विभागाकडे तत्काल देण्याचे आव्हाहन केले.
कार्यक्रमास सर्वोदय संस्थापकीय अध्यक्ष यशवंत डोर्लेकर , सर्वोदय संस्थेचे चेअरमन वसंत नाटेकर, समर्थ साई संस्थेचे चेअरमन ओंकार खडपे, शिवसागर संस्थेचे सचिव अविनाश डोर्लेकर , सागरी मच्छिमार संघटनेचे कार्यकर्ते संजय बुवा डोर्लेकर सरपंच लक्ष्मण सारंग , उपसरपंच वैभव नाटेकर माजी सरपंच रामचंद्र आंबेरकर नारायण मिरजुळकर, जयदास मिरजुळकर, गणेश आडवीरकर, संतोष डोर्लेकर, निलेश डोर्लेकर, एकता मंच कार्यकर्ते, मच्छिमार व महीला, मत्स्य विभागाचे सागर मित्र उपस्थित होते . मच्छिमारांच्या सागरी सुरक्षेचे प्रशिक्षणास उत्स्फूर्त सहभाग लाभला .
*संवाद मिडिया*
🔰 *(MITM)*🔰
*मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट ओरोस, सुकळवाड*
*🧑🏻🎓प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!👩🎓*
*🎒10वी /12वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*
*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित एकमेव डिप्लोमा व अभियांत्रिकी महाविद्यालय*
*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्तआणि 💯 नोकरीची संधी*
*देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट डिप्लोमा व इंजिनिअरिंग कॉलेज* 👨🎓👩🎓
🧾 *उपलब्ध कोर्सेस*👇
◼️ *पदवी (इंजिनिअरिंग) अभ्यासक्रम*
♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷
♦️ *कॉम्प्युटर इंजिनिअरिंग*🖥️
♦️ *इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग*
https://sanwadmedia.com/99360/
◼️ *पदवीका (पॉलिटेक्निक)अभ्यासक्रम*
♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷
◼️ *पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ *B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )*
✅ *B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )*
*🔻📖प्रमुख वैशिष्ट्ये📖🔻*
*👉🏻१३ वर्षांची शैक्षणिक परंपरा*
*👉🏻अनुभवी व तज्ञ प्राध्यापक*
👉🏻 *राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन*
*👉🏻उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप*
🔬🧰
*💯 👷नोकरीची संधी 👍🏻👷*
🪪👩🏻🎓🧑🏻🎓
*स्कॉलरशिप*
*EBC/ EWS/OBC* *या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना *50% शैक्षणिक फी मध्ये सवलत*
🆓 *SC/ST/NT/SBC/VJ/DT* *या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*
*🏣विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व कॅन्टीन सुविधा उपलब्ध*
*आजच आपला प्रवेश निश्चित करा…👍📝*
*आताच भेट द्या –👇🏻*
*सुकळवाड , सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ , ता- मालवण,जिल्हा -सिंधुदुर्ग (४१६५३४)जि. सिंधुदुर्ग*
*http://www.mitm.ac.in/*
*संपर्क -*📞
*02362-299195*
*9420703550*
*9987762946*,
*9819830193*,
*9423301564*,
*9029933115*
🪪 *सुविधा केंद्र*🪪
*(MITM)*
🔰 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट*🔰
*FC Code-3440*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/99360/
———————————————-