कणकवली
आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मिडीअम स्कूल नडगिवे येथे गुरूपौर्णिमा उत्साहात संपन्न झाली या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक कौस्तुभ देसाई, संस्था समन्वयक पराग शंकरदास यांसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात यावेळी आठवीतील विद्यार्थ्यांनी श्लोक व ‘गुरू ने दिला ज्ञान रुपी वसा’ ही प्रार्थना सादर केली. गुरू चरणी नतमस्तक होण्याचा हा दिवस त्या अनुषंगाने प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना इयत्ता सातवी मधील विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली शुभेच्छा पत्र देऊन त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून आशीर्वाद घेतले. इयत्ता सहावी मधील विद्यार्थ्यांनी गुरू पौर्णिमेचा आनंदी आनंद हे गीत सादर करून वातावरण मंत्र मुग्ध केले. फहाद सारंग याने इंग्रजी, महविष मुल्ला हिने संस्कृत, सिया कदम हिने मराठी तर तरेश तुरळकर याने हिंदी या भाषेमधून आपले गुरू प्रती विचार व गुरूचे महत्त्व विषद केले. प्रशालेतील शिक्षकांनी गीत सादर करून कार्यक्रमात रंग भरला. प्रशालेतील शिक्षिका निलम डांगे यांनी गुरूची महती वर्णन केली. शिक्षकेतर कर्मचारी अनिल कर्ले यांनी या प्रसंगी विचार व्यक्त केले. प्रशालेचे मुख्याध्यापक कौस्तुभ देसाई यांनी गुरू पौर्णिमेचे महत्त्व विषद करत सर्वांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्र संचालन इयत्ता आठवीतील नबिहा काझी व झिदान सारंग यांनी केले. याच दिवसाच्या औचीत्याने शाळेच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या स्कूल बस चे जल्लोषात स्वागत करून विधिवत पद्धतीने मुलांच्या शुभ हस्ते पूजन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.