You are currently viewing जिल्ह्यातील एका न.प. स्वीकृत नगरसेवकाचे पद धोक्यात…

जिल्ह्यातील एका न.प. स्वीकृत नगरसेवकाचे पद धोक्यात…

धर्मादाय आयुक्तांचा निर्णय नगरसेवकाच्या विरोधात

सिंधुदुर्गनगरी

एका संस्थेचा उपाध्यक्ष असल्याची खोटी कागदपत्रे सादर करत स्वीकृत नगरसेवक म्हणून वर्णी लागलेल्या जिल्ह्यातील मध्यवर्ती तालुक्यातील शहराच्या नगर परिषदेच्या एका स्वीकृत नगरसेवकाचे पद धोक्यात आले आहे. धर्मादाय आयुक्त न्यायाधिकरणाने दिलेला निर्णय या नगरसेवकाच्या विरोधात गेला आहे.

कोणत्याही नगर परिषदेत विकृत नगरसेवक व्हायचे असल्यास संबंधित व्यक्ती धर्मादाय विभागाकडे नोंदणीकृत असलेल्या संस्थेची पदाधिकारी असावी लागते. असे असताना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती असलेल्या नगर परिषदेमध्ये स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी संबंधित व्यक्तीने खोटी कागदपत्रे जोडल्याचा संशय त्याच नगरपरिषद विभागातील काही जणांना होता. त्यामुळे त्यांनी या नगरसेवकांच्या विरोधात धर्मादाय आयुक्त नगर न्यायाधीकरणाकडे याबाबत तक्रार दाखल केली होती. या विरोधातील दाखल असलेले अपील धर्मादाय आयुक्तांनी मान्य केले आहे. त्यामुळे या नगरसेवकाचे स्वीकृत नगरसेवक पद धोक्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा